समजा खूप भूक लागल्यामुळे तुम्ही ऑनलाइन जेवण ऑर्डर केलं आणि तुम्ही ऑर्डर येण्याची वाट बघत असाल. पण, जेवण येण्याऐवजी तुम्हाला ‘सॉरी, तुमचं जेवणं मी खाल्लं’ असा मेसेज आला तर विचार करा कसं वाटेल? एका तरुणीसोबत असंच काहीसं घडलंय.
लंडनमध्ये इली इलियास या 21 वर्षीय तरुणीने दोन बर्गर, चिप्स आणि चिकन रॅपसाठी 20 डॉलर ( जवळपास 1,456 रुपये) मोजले आणि उबर ईट्स(Uber Eats) अॅपद्वारे ऑर्डर केली. ऑर्डरची वाट बघत असतानाच तिला डिलिव्हरी ड्रायव्हरडून एक मेसेज आला जो वाचून ती हैराण झाली. ‘सॉरी Love, तुझं जेवण खाल्लं’ असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. इतकंच नाही तर अॅप ओपन केल्यावर त्यावरही जेवणाची ऑर्डर डिलिव्हर झाल्याचं तिला दाखवलं आणि इच्छा असेल तर डिलिव्हरी ड्रायव्हरला टिप देण्यास सांगितलं.
Is my ubereats driver okay???? pic.twitter.com/sKwnKoMp8M
— (@idakher) February 6, 2021
नंतर इलियासने ड्रायव्हरकडून आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि माझा उबर ईट्सचा ड्रायव्हर ठिक आहे ना असा सवाल विचारला. त्यानंतर उबर ईट्सकडे संपर्क साधून तक्रार केल्यावर तिला मोफत जेवण देण्यात आलं. पण या घटनेनंतर द सनसोबत बोलताना तिने ड्रायव्हरला दोष देण्यास नकार दिला. “तो खरंच भूकेला असेल. मी महामारीच्या संकटात या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला बेरोजगार करु शकत नाही. मला सर्व घटना थोडी मजेशीर वाटली”, असं तिने म्हटलं.