१९८४ साली स्पायडर मॅन कॉमिक पुस्तकातील कलाकृतीचं एक पृष्ठ गुरुवारी लिलावात विक्रमी ३३.६ लाख डॉलर्संला विकलं गेलं. मार्वल कॉमिक्सच्या सिक्रेट वॉर्स नंबर-८ च्या पृष्ठ २५ वर माईक झॅक यांची कलाकृती आहे. स्पायडर-मॅनला प्रथमच काळ्या सूटमध्ये दाखवले आहे. मात्र त्यानंतर तो ‘वनेम’च्या व्यक्तिरेखेतून समोर आला. डलासमधील हेरिटेज ऑक्शन्सच्या चार दिवसीय कॉमिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पृष्ठासाठी बोली ३३ हजार अमेरिकन डॉलर्सवर लावली गेली. त्यानंतर ही बोली ३० लाखांच्या पार पोहोचली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यू.एस. कॉमिक बुकच्या आतील पानाचा मागील विक्रम १९७४ च्या “द इनक्रेडिबल हल्क” च्या अंकातील कलेसाठी ६,५७,२५० अमेरिकन डॉलर होता. ज्यामध्ये वूल्व्हरिनच्या पहिल्या देखाव्यासाठी छेडछाड करण्यात आली होती.

दुसरीकडे, सुपरहिरो ‘सुपरमॅन’च्या पदार्पणाशी संबंधित असलेल्या प्रतींपैकी एक, ‘अ‍ॅक्शन कॉमिक्स नंबर-१’, गुरुवारी ३१.८ लाख डॉलरमध्ये विकली गेली. आतापर्यंतच्या सर्वात मौल्यवान पुस्तकांपैकी एक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiderman comic page sells black costume origin sells for 33 lakh rmt
First published on: 14-01-2022 at 12:58 IST