दिनेश चंडिमलच्या (३२६ चेंडूंत नाबाद २०६ धावा) शतकाच्या बळावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि ३९ धावांनी विजय मिळवला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर १९० धावांची आघाडी मिळवल्यानंतर पाहुण्यांना अवघ्या १५१ धावांमध्ये गुंडाळत श्रीलंकेने मालिकेमध्ये १-१ ची बरोबरी केली. या सामन्याचा खरा हिरो ठरलेल्या चंडिमलने मारलेला एक षटकार एवढ्या दूर गेला की चेंडू थेट मैदानाबाहेरील रस्त्यावरील एकदा पादचाऱ्याला लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या कसोटीमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसं काढली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पहिल्या सहापैकी पाच फलंदाजांनी अर्थशतकं झळकावली. त्यातही दिनेश चंडिमलने दिमुथ करुणारत्ने (८६) आणि कुसाल मेंडिस (८५) यांच्या मदतीने डावाला आकार दिला. सामन्यामध्ये नाबाद राहिलेल्या चंडिमलने मारलेला एक षटकार विशेष चर्चेत असून हा षटका थेट मैदानाबाहेर जाऊन एका पदचाऱ्याला चेंडू लागला.

झालं असं की सामन्यातील १७९ व्या षटकामध्ये मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. त्याने चंडिमलला ऑफ स्टम्पबाहेर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. या चेंडूवर चंडिमलने मीड विकेटवरुन षटकार लगावला. हा फटका पाहून मैदानामधील प्रेक्षक आणि ड्रेसिंग रुममधील चंडीमलचे सहकारी टाळ्या वाजवून आनंद साजरा करु लागले. मात्र दुसरीकडे हा षटकार मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेर असणाऱ्या रस्त्यावर मित्रांसोबत चालत असणाऱ्या मुलाच्या पोटाला लागला. त्याच्या मित्रानेच नंतर चेंडू पुन्हा मैदानात फेकला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

पाहा व्हिडीओ…

या विजयासहीत श्रीलंकेने सामना तर जिंकलाच शिवाय १-१ ची बरोबर करत मालिकाही वाचवलीय. या सामन्यात स्टार्कने चार बळी घेतले. श्रीलंकेमध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षादरम्यान हा विजय क्रिकेट चाहत्यांना एखाद्या सुखद धक्क्यासारखा आहे अशी भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केली जातेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lankan batter dinesh chandimal big six hits a boy outside the stadium scsg
First published on: 12-07-2022 at 09:26 IST