तुमच्या कामाच्या ठिकाणावरून काढून टाकण्याची अनेक कारणे असू शकतात उदा. तुमच्या कामाची खराब कामगिरी, कपंनीच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन आणि बरेच काही. पण एका कर्मचाऱ्याला थोड्या विचित्र कारणास्तव त्याच्या कामावरून काढून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गरम गरम जेवण कोणाला नको असते? तुम्हाला जर कामाच्या गडबडीमध्ये ऑफिसमध्ये दुपारचे जेवण गरम मिळाले तर त्यापेक्षा चांगले काय असू शकते. पण स्टारबक्सच्या कर्माचाऱ्यासाठी मात्र हे ऑफिसमध्ये जेवण गरम करुन खाणे चांगलेच महागात पडले आहे.

स्टारबक्ससाठी काम करणार्‍या एका व्यक्तीला कंपनीच्या ओव्हनमध्ये त्याचे वैयक्तिक अन्न गरम केल्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आले. पण या व्यक्तीला कामावरुन काढून टाकण्याचे कथित कारण अतिशय असामान्य पद्धतीने समोर आले. नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यातच घडलेल्या गोष्टी दाखवल्या आहेत.

transformer Failure Mahapareshan,
महापारेषणच्या ५० एमव्हीए रोहित्रात बिघाड, वसई विरारमधील वीज पुरवठ्यावर परिणाम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Syria,lebanon Israel,pagers pager blast
विश्लेषण : लेबनॉन पेजर स्फोटांमागे इस्रायल? पॅकिंगच्या वेळीच पेजरमध्ये स्फोटके पेरली?
Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
R. G. Chandramogan hatsun agro products arun icecream owner net worth house and success story from selling icecreams to becoming a billionaire
एकेकाळी हातगाडीवर विकायचे आईस्क्रीम अन् आता आहेत अब्जावधींचे मालक; वाचा एकविशीत कंपनी सुरू करणाऱ्या आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा

कंपनीच्या ओव्हनमध्ये कर्मचाऱ्याने गरम केले अन्न

@fugnarr नावाचे अकांऊट असलेल्या यूजरने TikTokवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने ऑफिसमध्ये स्टीक टॅको कसे तयार केले हे दाखवले आहे. व्हिडिओमध्ये त्याने स्टारबक्सच्या कन्व्हेक्शन ओव्हनमध्ये ते तळताना आणि इतर सर्व घटकांसह टॅकोमध्ये स्टीकचे तुकडे टाकताना दिसत आहे.

हेही वाचा : मी झोपलेलो नाही तर…नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना यांचा मजेदार खुलासा, फोटो व्हायरल

कर्मचाऱ्याला टाकले कामावरुन काढून

स्टारबक्स आपल्या कर्मचार्‍यांना त्यांचे वैयक्तिक अन्न कंपनीच्या ओव्हनमध्ये पुन्हा गरम करण्यास परवानगी देत ​नाही. हा प्रकार समजल्यानंतर स्टारबक्समध्ये कर्मचाऱ्यावर कारवाई केली पण त्याला कामावरुन काढून टाकले. त्यानंतर या टिकटॉकरने, पार्किंग लॉटमध्ये स्वतःचे फोटो कॅप्शनसह पोस्ट केले. “गुडबाय, स्टारबक्स, तो स्टेक गरम होता.”

@fugnarr Tiktok

व्हिडिओमध्ये एका चित्रात @fugnarr आणि कामावरुन काढून टाकण्याचे कारण दर्शविणारे कागदपत्रे देखील दिसत आहेत. “स्टीक खूप छान आहे, HR ने सिक्रेट रेसिपीसाठी माझी चौकशी केली,” @fugnarr ने व्हिडिओला कॅप्शन दिले.

Pakistani Elon Musk: पाकिस्तानमध्ये फळ खरेदी करताना दिसला एलॉन मस्क! हा व्हायरल फोटो पाहिलात का?

@fugnarr Tiktok

व्हायरल झाला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ

@fugnarr चा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताच, अनेकांनी बरिस्ताच्या कारवाईचे समर्थन दिले आणि सहानुभूती व्यक्त केली. तर काहींनी कर्मचाऱ्याच्या कारवाईचे समर्थन केले. एक युजरने कमेंट केली की, त्यांनी तुम्हाला प्रमोशन द्यायला हवे होते.

@fugnarr Tiktok

तर “तुम्ही फक्त तुमचे दुपारचे जेवण पुन्हा गरम करत होता, चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढण्यात आले आहे,” अशी कमेंट दुसऱ्याने केली.

@fugnarr Tiktok

एका Reddit पोस्टमध्ये, स्टारबक्सच्या एका कामगाराने स्पष्ट केले की, “स्टारबक्स धोरण आणि अन्न आणि सुरक्षा प्रक्रियेनुसार, आम्ही ओव्हनमध्ये घरून आणलेले अन्न गरम करणे अपेक्षित नाही.” सर्वच कर्मचारी अशा समस्यांमध्ये अडकत नाही. त्याने असाही दावाही केला आहे की, कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांचे त्यांच्या चांगल्या कामासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी केलेल्या अतिरिक्त प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुक करते.

संबधित कामावरून काढून टाकण्याचे हे एकमेव कारण होते की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. तुम्हाला स्टारबक्सच्या या धोरणाबाबत काय वाटते? कमेंटमध्ये कळवा.