पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतातील ग्वादर शहरामध्ये बलुची दहशतवाद्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा एक पुतळा चक्क बॉम्बने उडवून दिलाय. स्फोटकांच्या मदतीने समुद्रकिनाऱ्यावर असणारा हा पुतळा दहशतवाद्यांनी पूर्णपणे उद्धवस्त केलाय.

पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा हा पुतळा सुरक्षित अशा ग्वादरमधील मरीन ड्राइव्ह नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरामध्ये होता. जून महिन्यामध्येच या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला. रविवारी सकाळी या पुतळ्याच्या पायथ्याजवळ स्फोटकं लावून तो उडवून देण्यात आला. या स्फोटामुळे पुतळा पूर्णपणे तुटला असल्याचं बातमीत म्हटलं आहे. या पुतळ्याचे आधीचे आणि स्फोटानंतर उडवून दिल्यानंतर त्या ठिकाणावरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

बीबीसी उर्दूने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या बलोच रिपब्लिकन आर्मीचा प्रवक्ता बबगर बलोचने ट्विटरवरुन या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलीय. ग्वादरचे उपायुक्त मेजर (सेवानिवृत्त) अब्दुल कबीर खान यांच्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी एक उच्च स्तरीय समिती करत आहे.

खान यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांच्या मदतीने जिन्नांचा पुतळा पाडणारे दहशतवादी पर्यटक म्हणून या परिसरामध्ये शिरले होते. या प्रकरणामध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र एक दोन दिवसांमध्ये तपास पूर्ण केला जाईल असं खान म्हणालेत. या प्रकरणाचा सर्व बाजूने विचार करुन तपास केला जात असून लवकरच दोषींना अटक केली जाईल असा विश्वास खान यांनी व्यक्त केलाय. बलूच दहशतवादी बलूचिस्तानला स्वातंत्र्य द्यावं आणि या भागामधील नागरिकांवर सुरु असणारे अत्याचार थांबावेत म्हणून प्रस्थापित सरकारविरोधात कारवाया करत असतात. त्याच कारावायांपैकी एका कारवाईमध्ये हा पुतळा उडवून दिल्याचं सांगण्यात येतंय.

जिन्ना हे १९१३ पासून १४ ऑगस्ट १९४७ पर्यंत म्हणजेच पाकिस्तानची स्थापना होईपर्यंत ऑल इंडिया मुस्लिम लीगचे नेते होते. त्यानंतर १९४८ साली त्यांचा मृत्यू झाला. ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. या पदावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला.