प्रत्येक व्यक्तीला आपल्या लग्नात इतरांपेक्षा काहीतरी खास आणि वेगळं करावं असं वाटतं. यासाठी ते आपापल्या परिने प्रयत्न करत असतात. शिवाय काही वेगळं करण्याच्या नादात अनेकजण भन्नाट अशा लग्नपत्रिका छापत असतात. अशा अनेक लग्नपत्रिका आपण सोशल मीडियावर पाहिल्या असतील. सध्या अशाच अनेक मनोरंजक लग्नपत्रिका व्हायरल होत आहेत.

मध्यंतरी जुन्नर तालुक्यातील अशीच एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. राज्यातील सध्याचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या आडनामुळे ही पत्रिका व्हायर झाली होती. कारण ‘शिंदे आणि ठाकरे यांची लग्नपत्रिकेत का होईना पण दिलजमाई झाली’ असे मिम्स या पत्रिकेमुळे व्हायरल होत होती.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

हेही वाचा- जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?

सध्या महाराष्ट्रातील नांदेडमधील डॉक्टरने छापलेल्या अशाच एका लग्नपत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण हे डॉक्टर महाशय शेअर बाजारचे एवढे मोठे चाहते आहेत की, त्यांनी आपल्या लग्नपत्रिकेची थीम शेअर मार्केटवर बनवली आहे. एवढंच काय तर लग्नपत्रिकेतील देवांची जागा देखील त्यांनी प्रसिद्ध शेअर मार्केट ट्रेडर्संना दिली आहे. त्यामुळे शेअर मार्केटच्या थीमवर आधारीत असलेल्या या पत्रिकेने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.

हेही वाचा- Viral Video: हायवेवर चक्क ड्राइव्हरशिवाय १ किलोमीटर धावला कंटेनर अन्…

ही पत्रिका द स्टॉक मार्केट इंडिया (thestockmarketindia) नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आली असून ती पुर्णपणे शेअर बाजाराशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील नांदेड येथील डॉक्टरने ती छापलेली पत्रिका तुम्ही जर वाचायला सुरुवात केली तर, साधारण लग्नपत्रिकांमध्ये ज्या ठिकाणी देवांची नावं असतात त्या ठिकाणी या डॉक्टरांनी तीन प्रसिद्ध शेअर मार्केट ट्रेडर्सची नावे लिहिली आहेत.

‘श्री झुंजानवाला प्रसन्न, श्री वॉरेन बफेट प्रसन्न आणि श्री हर्षद मेहता प्रसन्न’, यानंतर, कार्डवर इंग्रजीमध्ये IPO लिहिलं आहे. ज्याला शेअर बाजाराच्या भाषेत Initial Public Offering म्हणतात, परंतु या पत्रिकेत त्याचा अर्थ Invitation of Precious Occasion असा दिला आहे. तर वधू-वर लिहण्याच्या ठिकाणी गुंतवणूकदार आणि लग्नाचे ठिकाण स्टॉक एक्सचेंज असं लिहिलं आहे. त्यामुळे हे डॉक्टर शेअर मार्केडचे खूप मोठे चाहते असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

सध्या ही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाक व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘डाय हार्ड स्टॉक मार्केट फॅन’, अशी कमेंट केली आहे. तर काहींनी ‘ही कल्पना खूप छान असून मी देखील अशीच पत्रिका छापणार’, असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी ही खोटी लग्नपत्रिका असल्याचं म्हटलं आहे. नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्या तरिदेखील या पत्रिकेमुळे शेअर मार्केटची आवड असणारे मात्र या पत्रिकेमुळे चांगलेच खूश झाले आहेत.