जगात सर्वाधिक चर्चेत असणारी निवडणूक म्हणजे अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक. ३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर बुधवारपासून या निवडणुकीचा निकाल लावण्यासाठी मतमोजणी सुरु आहे. मात्र या मतमोजणीदरम्यानच सध्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जवळजवळ निश्चित आहे. मतमोजणी सुरु असून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपण पिछाडीवर पडत असल्याचे दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये धावही घेतली, पण जॉर्जिया आणि मिशिगन मधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली आहे. मात्र त्यानंतर ट्रम्प आपल्या दाव्यावर ठाम असून त्यांनी यासंदर्भात ईमेल आणि ट्विटवरुन दावे करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या अशाच एका ट्विटची सध्या सोशल नेटवर्किंगवर खिल्ली उडवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु झाल्यापासूनच वेगवेगळे दावे करण्यास सुरुवात केली असून आपण ही निवडणूक आधीच जिंकलो असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रोल व्होट्समध्ये बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा खूपच पुढे आहेत. त्यामुळेच आता ट्रम्प यांनी मतमोजणी थांबवावी अशी मागणी केली आहे. याचसंदर्भात त्यांनी गुरुवारी ट्विटवरुन कॅपिटल लेटर्समध्ये ‘स्टॉप द काऊंट’ म्हणजेच मतमोजणी थांबवा असं पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

मात्र अनेकांनी यावरुन ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी या तीन शब्दांवरुन ट्रम्प यांच्यावर मजेशीर पद्धतीने टीका करण्याबरोबरच मिम्स आणि वन लायनर पोस्ट करण्यास सुरुवात केलीय.

प्रसिद्ध संगितकार झेडनेही यावर भाष्य केलं आहे


त्याचबरोबर भारतातीयांनाही यावर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.


इतरही अनेक प्रतिक्रियांचा पाऊस या ट्विटवर पडला आहे.

 स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना याच ट्विटवरुन सणसणीत टोला लगावला आहे. ट्विटवरुन ग्रेटाने ट्रम्प यांना त्यांच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. शांत व्हा आणि एखादा चित्रपट पाहा आणि रागावर नियंत्रण मिळवण्यावर थोडं काम करा असा चिमटा ग्रेटाने काढला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop the count netizens have a field day online as donald trump tweet on vote counting goes viral scsg
First published on: 06-11-2020 at 15:25 IST