Viral Post :- मित्र-मैत्रिणींसोबत ट्रेकिंगला, गड-किल्ल्यांवर जाताना अनेक जण सकाळपासून ते रात्रीपर्यंत लागणाऱ्या अनेक गोष्टी घरातूनच घेऊन जाताना दिसतात. कारण- अशा उंच डोंगराळ भागात दुकाने किंवा इतर काही वस्तू मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पण, आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, एका ३९३ फूट उंच डोंगराच्या कड्यावर एक दुकान बांधलं आहे, तर तुमचा विश्वास बसेल का?

ट्विटरवरील एका व्हायरल पोस्टमध्ये असंच काहीसं बघायला मिळालं आहे. १२० मीटर लांब व ३९३ फूट उंचीचा एक डोंगर आहे. हा डोंगर चीनमधील हूनान प्रांतात स्थित आहे. या उंच डोंगराच्या कड्यावर तुम्हाला एक दुकान दिसेल; जे लाकडापासून बनवलं गेलं आहे. हे दुकान डोंगराच्या कड्यावर वसलेलं आहे. एका फोटोत तुम्ही पाहू शकता की, लोहाच्या क्लिप्सच्या मदतीने डोंगराच्या कड्यावर हे दुकान टांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या फोटोत तुम्ही पाहू शकता की, काही जण हा उंच डोंगर चढताना दिसत आहेत. तर याच डोंगर चढणाऱ्या व्यक्तींच्या नाश्तापाण्यासाठी किंवा त्यांना एखादी वस्तू खरेदी करता यावी यासाठी हे दुकान बांधण्यात आलं आहे. तसंच या छोट्याशा दुकानात फक्त एकच व्यक्ती काम करू शकते, असंदेखील सांगण्यात येत आहे.एवढ्या उंच डोंगराच्या कड्यावर हे दुकान कसं बांधलं गेलं असेल, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ! तर नक्की बघा ३९३ फूट उंचीवर बनवलेलं हे अदभुत दुकान.

हेही वाचा :- किळसवाणा प्रकार! कांदा- मिरचीच्या फोडणीत टाकले झुरळ; नंतर भाजून चटणीसोबत खाल्ले; Video व्हायरल

नक्की बघा पोस्ट :-

सोशल मीडिया आप ट्विटरच्या (@gunsnrosesgirl3) या अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. एका वेगळ्याच ठिकाणी उभारलेल्या या दुकानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक जण पोस्टच्या कमेंटमध्ये घर बांधलेल्या व्यक्तीच्या कौशल्याची प्रशंसा करीत आहेत. अनेक जण हे घर अशा लोकेशनवर बांधलं गेलं हे पाहून चकित होत आहेत; तर अनेक जण हा उत्तम प्रयोग असल्याचंदेखील मत मांडताना दिसत आहेत.