गणपती बाप्पा हे भाविकांचं लाडकं दैवत. भारत देशात गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. भारतात अनेक जागृत, स्वयंभू देवस्थाने आहेत. गणपती बाप्पा हा अबालवृद्धांपासून भिन्न धर्मियांपर्यंत सर्वांना आपलासा आणि हवाहवासा वाटतो. भारतात गणपतीची अनेक प्रसिद्ध मंदिरे आपल्याला आढळून येतात आणि त्यावरून तिथल्या रस्त्यांना नावं देखील दिली जातात. पण अमेरिकेतही गणेश मंदिर गल्ली आहे, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. होय. अमेरिकेतल्या एका रस्त्याला ‘गणेश मंदिर मार्ग’ असं नाव देण्यात आलंय. हा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतल्या न्यू यॉर्कमधील एका प्रख्यात मंदिरासमोरील रस्त्याचं नाव ‘गणेश मंदिर मार्ग’ ठेवण्यात आलंय. संपूर्ण भारतीयांसाठी आणि हिंदू समुदायांसाठी अभिमानाची बाब आहे. इथल्या उत्तर अमेरिकामधील हिंदू मंदिर सोसायटीने हा मोठा निर्णय घेतलाय. हिंदू टेंपल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका या सोसायटीतील लोकांनी एकत्र मिळून ‘श्री महावल्लभ गणपती देवस्थानम’ची स्थापना १९७७ मध्ये केली. उत्तरी अमेरिकामधील हिंदूंचं हे सर्वात जुनं आणि पहिलं गणेश मंदिर आहे.

आणखी वाचा : अन् बघता बघता सारेच जण जमिनीत सामावले, अंगावर काटा आणणारा हा VIRAL VIDEO पाहाच

हे हिंदू मंदिर क्वीन्स काउंटीमधील फ्लशिंग इथे स्थापित आहे. मंदिराच्या बाहेरील रस्त्याला ‘बून स्ट्रीट’ असं नाव देण्यात आलं आहे, ‘जॉन बून’ हे अमेरिकन धार्मिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि गुलामगिरीविरोधी चळवळीचे नायक आहे. शनिवारी एका विशेष समारंभात प्रसिद्ध गणेश मंदिराच्या स्मरणार्थ या रस्त्याला ‘गणेश मंदिर मार्ग’ असं नाव देण्यात आलं.

या समारंभाला न्यूयॉर्कमधील भारताचे कौन्सुल जनरल रणधीर जैस्वाल, क्वीन्स बरोचे अध्यक्ष डोनोव्हन रिचर्ड्स, न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांच्या कार्यालयातील व्यापार, गुंतवणूक आणि नवोपक्रम विभागाचे उपायुक्त दिलीप चौहान आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते. तसंच भारतीय-अमेरिकन समुदायातील अनेक लोक देखील उपस्थित होते. रिचर्ड यांनी या सोहळ्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

आणखी वाचा : रुग्णवाहिकेच्या मागे तब्बल ५ मैल धावत राहिला घोडा, का ते जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे भांडण सोडवण्यासाठी गेला होता डिलिव्हरी बॉय, पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO

या प्रसंगी जयस्वाल म्हणाले की, रस्त्याला दुसरं नाव देणं हा केवळ उत्सवाचा विषय नाही तर ते “हे यश मिळवण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाचं फळ देखील दर्शवितं.” या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक भारतीयांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street in new york named ganesh temple street after prominent hindu temple prp
First published on: 04-04-2022 at 19:49 IST