मुंबई पोलिस सोशल मीडियाचा वापर करून वाहतुकीचे नियम आणि वाहन चालकांच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी पोस्टमधून सांगत असतात. तसेच कठीण प्रसंगात ते नागरिकांच्या मदतीसाठी सुद्धा धावून येतात. पण, काही जण असे असतात, जे त्यांच्या कामावर संशय घेत, विनोद करताना दिसतात. तर आज मुंबई पोलिसांनी अशाच एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

तर घटना अशी आहे की, ३ आणि ४ मे च्या रात्री मुंबई पोलिस वर्सोवामध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’साठी वर्सोवा परिसरात जमले; ज्याचा उद्देश शहरातील संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणे असा होता. त्यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याबरोबरच इतर बेकायदेशीर कृत्यांचा मागोवा घेण्यासाठी ११ ठिकाणी नाकेबंदी केली होती.

हेही वाचा…VIDEO: चहाचं वेड! वेळेत चहा हवा म्हणून लढवली शक्कल; पाहा चहाप्रेमीसह कामगाराची तारेवरची कसरत

पोस्ट नक्की बघा…

ड्रिंक अँड ड्राईव्ह, बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज बाळगणे या घटना टॅप करीत असताना पोलिसांनी सामान्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले का? असा सवाल एका मुंबईकराने उपस्थित केला आहे की, मुंबई पोलिस त्यांच्या विशेष मोहिमेवर असताना कदाचित सतर्क नव्हते किंवा जाणूनबुजून ट्रिपल सीट बसणे आणि हेल्मेटविना दुचाकी चालवण्याचे प्रकार दुर्लक्ष करीत होते. पण, पोलिसांनी सामायिक केलेल्या अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, त्यांनी त्यांच्या कामाला न्याय मिळवून दिला आहे.

‘हेल्मेटशिवाय दुचाकीस्वार व ट्रिपल सीट बसून काही वाहन चालक वर्सोवा येथे नाकबंदीच्या पुढे जात आहेत’ ; अशी मनीष गावडे नावाच्या एका व्यक्तीने एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. तर ही पोस्ट पाहून मुंबई पोलिसांनी सुद्धा प्रतिउत्तर दिलं आहे त्यात असं लिहिलं आहे की, ‘तुमची विनोदबुद्धी पाहून आनंद झाला सर! आम्ही आमचे कर्तव्य करत राहू सर पण प्रामाणिकपणे असा निष्काळजीपणा अनेकदा दुःखद असू शकतो, हास्यास्पद नाही’ ; असे चोख उत्तम मुंबई पोलिसांनी दिलं आहे. तर मुंबई पोलिसांचे हे उत्तर पाहून सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर पोस्ट @MumbaiPolice यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.