Bride ukhana video viral: लग्नातील नवरी नवरदेवाच्या उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाणे ऐकून पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते प्रचारामध्ये व्यस्थ आहे. अशातच एका नव्या नवरीनं वंचित बहुजन आघाडीचा उखाण्यातून प्रचार केला आहे. या नवरीचा उखाणा ऐकून तुम्हीही कौतुक कराल. सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. कधी नवरी नवरीची धमाकेदार एंट्री तर कधी वरातीतला डान्स तर कधी अनोखे उखाणे लक्ष वेधून घेतात. असाच एक उखाणा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत आहे.

गेल्यावर्षा शिंदे आणि ठाकरे यांच्यात झालेल्या सत्तासंघर्षादरम्यान सोशल मीडियावर “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आसाममधील गुवाहाटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्यासोबत फोनवरून संवाद साधला. दरम्यान त्यांनी गुवाहाटी येथील स्थितीचं वर्णन “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” अशा शब्दात केलं होतं.

त्यांचा हा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डायलॉगची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर आता या नवरीनं त्याचाच संदर्भ घेऊन उखाणा घेतलाय. हा उखाणा एकून तुम्हीही पोट धरुन हसाल. या नव्या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल असा कोणता उखाणा घेतलाय? तर या नवरीने “वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याच्या वाटीनं भरली ओटी, ओटीत भरले पन्नास कोटी आमदार पळाले गुवाहाटी, नको ते डोंगर नको ती झाडी विवेक रावांचं नाव घेते सगळ्यात भारी आपली वंचित बहुजन आघाडी” असा भन्नाट उखाणा घेतला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं..” पुण्यात नेत्यांच्या प्रचाराला जाणाऱ्या तरुणांना भर चौकात लगावला टोला

हा व्हिडीओ shreyas_tambe_official या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून “पहिल्याच दिवशी वहिनीने केलं वंचितमय वातावरण. विवेक शिर्के गोरेगाव तालुका अध्यक्ष, वंचित आघाडी यांच्या पत्नीनं घेतला उखाणा.” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.