Viral Video: शिक्षकाने विद्यार्थ्यांना टॅलेंट दाखवण्यास सांगितले; पण पुढे जे काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Viral_Video
Viral Video: शिक्षकाने विद्यार्थ्यांना टॅलेंट दाखवण्यास सांगितले; पण पुढे जे काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर दरदिवशी कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो. काही व्हिडिओच्या माध्यमातून बोध मिळतो. तर काही व्हिडिओ तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. इतकंच नाही तर अनेक जण हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी वर्गात आपल्या कला दाखवताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून सर्वांनाच हसायला येते. हा व्हिडिओ एका वर्गातील असून शिक्षक चार विद्यार्थ्यांना बोलावून त्यांची प्रतिभा दाखवण्यास सांगतात. यानंतर विद्यार्थी जे काही करतात ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

हा मजेदार व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला असून मोठ्या संख्येने सोशल मीडिया युजर्स शेअर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ३२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये वर्गातील शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना प्रतिभा दाखवण्यास सांगितले.

पहिला विद्यार्थी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढतो. त्यानंतर एक एक करत इतर विद्यार्थी कुत्र्यांच्या विविध शैलीतील आवाज काढतात. प्रत्येक जण आवाज काढत असताना हसू आवरत नाही. हा आवाज हुबेहुब असल्याची जाणीव देखील होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Student viral video on barking dog action rmt

ताज्या बातम्या