Students Vulgar Remark On Teacher: पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांना हाताळणं हे शिक्षकांसाठी किती कठीण असतं हे आजवर अनेक व्हिडीओजमधून आपण पाहिलेलं आहे. मात्र आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तुम्हाला एकाच वेळी विद्यार्थ्यांची चीड व शिक्षिकेचा अभिमान वाटेल. अलीकडेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वर्गादरम्यान शिक्षिकेला अश्लील पद्धतीने प्रश्न विचारून चिडवण्याचा प्रयत्न केला पण या शिक्षिकेने निर्भीडपणे व विशेषतः गोंधळून न जाता या विद्यार्थ्यांचा खरपूस समाचार घेतला. या शिक्षिकेने सदर प्रकार स्वतः आपल्या इंस्टाग्राम चॅनेलवर शेअर केला आहे. तसेच अन्य शिक्षिकांना सुद्धा अशा स्थितीत निराश न होता स्वतःचा मान राखायला विसरू नका असे आवाहन केले आहे. नेमका हा प्रकार काय होता हे पाहूया..
इन्स्टाग्राम युजर रक्षिता सिंग बांगर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या बायोनुसार ती एक जीवशास्त्र शिक्षिका असून त्यांनी एमबीबीएस देखील केले आहे. एका ऑनलाईन वर्गात तिच्या एका विद्यार्थ्याने तिला अश्लील पद्धतीने अभ्यासातीलच एक प्रश्न विचारला होता. ज्यावर तिने सडेतोड उत्तर दिले आहे. शिवाय कॅप्शनमध्ये तिने अन्य शिक्षिकांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
“शिक्षिका असल्याने, मला नेहमीच वाटते की केवळ शिकवणे नव्हे तर त्यांना चांगले माणूस बनण्यास मदत करणे ही माझी जबाबदारी आहे! म्हणून जर काही त्रास देणारे विद्यार्थी असतील तर मी त्यांच्याशी सडेतोड पण तितकंच समजुतीने वागण्याचा प्रयत्न करते. पण माझ्या मागील ४ वर्षांच्या ऑनलाइन अनुभवानुसार जेव्हा इतक्या खालच्या पातळीच्या कमेंट येतात तेव्हा मी त्यांना नम्रपणे उत्तर देत नाही! जर मी २३ वर्षांची असून समजूतदार असू शकते, विचारपूर्वक बोलायची शिस्त बाळगू शकते तर १७- १८ वर्षांच्या मुलांनी शिक्षकांचा किमान आदर करणे तरी नक्कीच शिकायला हवे.
Video: अश्लील प्रश्नावर शिक्षिकेचं सडेतोड उत्तर
हे ही वाचा<< मुकेश अंबानींना धमकावणारा पोलीस पुत्र! स्वतः सांगितलं, ‘या’ पाक खेळाडूची बॅटिंग बघताना कसा सुचला खंडणीचा प्लॅन
दोन दिवसांपूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून, क्लिपला जवळपास ४.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या शिक्षिकेच्या हिमतीने कौतुक केले आहे. तर अशा मुलांना घरून शिस्त लावली जायला हवी. त्यांच्या पालकांनी यामध्ये लक्ष द्यायला हवे असेही सल्ले काहींनी दिले आहेत. तुम्हाला या एकूण प्रकाराविषयी काय वाटते व विद्यार्थी दशेतील मुलांच्या अशा वागणुकीस कोण जबाबदार आहे असे वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.