२३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळून भारतीय संघ टी२० विश्वचषकाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानात खेळाला जाणारा हा सामना अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे. गेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता भारतीय संघ याची परतफेड करायला सज्ज आहे.

मात्र, या सामन्याआधीच भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान संघाचे कप्तान बाबर आझम यांची भेट घेतली आहे. यावेळी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक, मोहम्मद युसूफ यांसारखे दिग्गजही उपस्थित होते. मॅथ्यू हेडनच्या फार्महाऊसवर गावस्कर यांनी पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतली. यावेळी गावस्कर यांनी बाबर आझमला खास भेट दिली आहे.

Suresh Raina interview on lantop,
IPL 2024 : ‘ज्या संघांनी पार्ट्या केल्या त्यांनी अजून आयपीएल जिंकली नाही’, सुरेश रैनाने नाव घेता ‘या’ संघांना डिवचले
Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानी संघाला भेट देण्याचं निमित्त म्हणजे संघाचा कप्तान बाबर आझम याचा जन्मदिन. १५ ऑक्टोबरला बाबरने टी२० विश्वचषकाच्या वेगवेगळ्या कर्णधारांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यानंतर त्याने आपल्या संघासह एका प्रायव्हेट डिनर पार्टीचा आनंद लुटला. या डिनरला सुनील गावस्कर यांनीही हजेरी लावले. यावेळी त्यांनी बाबर आझमला एक खास भेट दिली आहे.

Viral Video : वडिलांना Swiggy मध्ये नोकरी लागल्यावर मुलीचा आनंद गगनात मावेना; केलं असं काही की…

सुनील गावस्कर यांनी बाबरला शुभेच्छा देत त्याला त्यांची स्वाक्षरी असलेली खास ‘सनी कॅप’ भेट म्हणून दिली आहे. पीसीबीने या खास भेटीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी गावस्कर यांनी बाबरला काही खास टिप्सही दिल्या. गावस्कर म्हणाले, ‘डीपमध्ये फील्डर असेल तर मनगटावर नियंत्रण ठेवा. मानसिकतेकडे लक्ष द्या. जर शॉटची निवड चांगली असेल तर कोणतीही अडचण नाही. परिस्थितीनुसार शॉटची निवड करा.’

Work From Pub : ना घर, ना ऑफिस… आता थेट पबमधून करा काम! हॉटेल मालकांची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर

या भेटीबद्दल गावस्कर म्हणाले, ‘माझी सनी कॅप मी फार कमी लोकांना देतो. हेडनच्या फार्महाऊसवर बाबर आझम यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. येथे संपूर्ण पाक संघ आला होता. मला पण जेवायला बोलावलं होतं.’ सुनील गावस्कर सध्या टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात असून ते आयसीसीच्या अधिकृत समालोचन पॅनेलचा एक भाग आहेत.