scorecardresearch

Premium

मुंबईच्या रस्त्यांवर सनी देओल मद्यधुंद अवस्थेत! रिक्षाचालकाने सावरले अन्…; Video झाला व्हायरल

सनी देओलचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

sunny deol roming drunk on juhu mumbai streets here is the truth of viral video
मुंबईच्या रस्त्यांवर सनी देओल मद्यधुंद अवस्थेत! रिक्षाचालकाने सावरले अन्…; Video झाला व्हायरल (photo – @single_soul1 twitter)

Drunk Sunny Deol Spotted at Mumbai : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सनी देओल अलीकडेच ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आला होता. तब्बल २२ वर्षांनंतर चित्रपटाच्या या दुसरा पार्टला बॉक्स ऑफिसवरही तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर सनी देओलकडे एकापाठोपाठ एक सिनेमांच्या रांगा लागल्या आहेत. यातच सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात मुंबईच्या रस्त्यावर तो दारुच्या नशेत अडखळत चालताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सनी देओलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सनी देओलची अशी अवस्था पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. पण त्याची ही अवस्था कशी झाली असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ मुंबईतील जुहू सर्कल परिसरातील असल्याचा दावा केला जात आहे, सनी देओल यावेळी मद्यधुंद अवस्थेत चालत होता असे म्हटले जात आहे. नशेमुळे त्याला नीट चालता येत नसल्याने तो चालत्या रिक्षाला जाऊन धडकतो. पण चालक रिक्षा थांबवत त्याला सांभाळतो. सनी देओलची ही अवस्था पाहून तो त्याला पकडून रिक्षात बसवतो. यावेळी सनी देओल त्याच्याशी बोलताना आणि हसताना दिसत आहे. या घटनेवेळी व्हिडीओ रिकॉर्ड करणाऱ्या व्यक्ती रिक्षा चालक फटकारतो. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेही शॉक झाले आहेत.

ms dhoni appointment letter for ticket collectors job in indian railways goes viral
महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या सरकारी नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर होतंय व्हायरल; PHOTO पाहून चाहते म्हणाले, ‘व्वा…”
a Man throws cash from luxury speeding range rover car
Video : श्रीमंतीचा दिखावा! चालत्या गाडीतून भर रस्त्यावर नोटा उडवताना दिसला तरुण, पोलिसांनी ठोठावला तब्बल एवढा दंड
youth stunt running vehicle pimpri
पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!
a traffic police keep his duty in filmy style while controlling traffic on the highway
कर्तव्याला कलेची जोड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला फिल्मी स्टाइल अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान सनी देओलचा हा व्हायरल व्हिडीओ फेक असल्याचे सांगितले जात आहे. यावर काहींनी म्हटले की, सनीने खरोखर दारु प्यायली नसून हा त्याचा आगामी चित्रपटाचा भाग आहे. त्यामुळे या व्हिडीओसंदर्भात कोणतीही सत्यता अद्याप समोर आलेली नाही.

कुणी करतंय ट्रोल तर कुणी करत समर्थन

दरम्यान काही चाहत्यांना सनी देओलने यापूर्वी केलेलं विधानं आठवत आहे. सनी देओलने अलीकडेच दावा केला होता की, त्याने वर्षांपूर्वी दारू सोडली होती आणि आता तो त्याला हातही लावत नाही. पण सनी देओलचा हा व्हिडिओ पाहून लोक त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत.

एका युजरने लिहिले की, ‘तो या स्थितीत आता पाकिस्तानशीही लढू शकतो.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘जर तुम्ही दारू पिऊन रस्त्यावर फिरत असाल तर कोणीतरी तुम्हाला गाडीने उडवून देऊ शकते.’ पण हा शूटिंगचा भाग असल्याचा संशय काही चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. सध्या सनी देओल मुंबईत त्याच्या ‘सफर’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अशावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा त्याच्याच शूटिंगचाच एक भाग असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. कारण सनी देओल अशी चूक करणार नाही हे उघड आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सनी देओल शेवटचा ‘गदर 2’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunny deol roming drunk on juhu mumbai streets here is the truth of viral video sjr

First published on: 06-12-2023 at 15:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×