Ram Navami : अयोध्येतील राम मंदिरात आज प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्य तिलक सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचा क्षण डोळ्यांत आणि स्मृतींमध्ये साठवून घेण्यासाठी भक्तांनी राम मंदिरात गर्दी केली आहे. २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभू रामचंद्राची बालरुपातील मूर्ती म्हणजेच रामलल्लाची मूर्ती या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करुन ठेवण्यात आली. त्यानंतर आज रामनवमीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर आहे तसंच सूर्यतिलक सोहळाही रंगतो आहे.

नेमका कसा होणार रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक?

रामनवमीच्या दिवशी म्हणजेच आज सूर्यप्रकाश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर असेल्या आरशात पडेल. तिथून तो प्रकाश परावर्तित होऊन पितळी पाईपमध्ये जाआईल

amit shah
“राम मंदिरानंतर आता माता सीतेचे भव्य मंदिर उभारणार”; अमित शाह यांचे आश्वासन; म्हणाले, “जे लोक रामापासून दूर जातात…”
Nagpur, girl Abuse, Lover absconded,
नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार
On the occasion of Akshaya Tritiya the price of gold increased by Rs 1500
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी! तोळ्यामागे १,५०० रुपयांची वाढ, तरी जोमदार मागणीचा सराफांचा दावा
Akshay Tritiya, Akshaya Tritiya Enthusiasm, Gold Purchase in Kolhapur, Rising Prices gold, marathi news, akshay Tritiya news, akshay Tritiya 2024, gold buy news,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोल्हापुरात सोन्याची खरेदी उत्साहाने
special pooja at tuljabhavani devi temple on akshaya tritiya z
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या भोवताली आंब्यांची आरास; अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने विशेष पूजा
sandal paste on mahadev s pind in dhaneshwar temple
चिंचवडमध्ये प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिडींवर चंदनाचा लेप; अशी आहे आख्यायिका!
Akshaya Tritiya, gold, price,
अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर
dagdusheth Ganpati marathi news, maha naivedya of 11 thousand mangoes marathi news
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पितळेच्या या पाईपमध्ये दुसरा आरसा बसवण्यात आला आहे त्यातून सूर्यप्रकाश ९० अंशात पुन्हा परावर्तित होईल.

यानंतर पितळेच्या या पाईपमधून सूर्यकिरणं तीन वेगळ्या लेन्समधून परावर्तित होतील

तीन लेन्समधून सूर्यकिरण लंबवर्तुळाकार पाईपमधून परावर्तित झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जो आरसा बसवण्यात आला आहे त्यावर पडतील.

लंबवर्तुळाकार पाईपच्या दुसऱ्या बाजूला लावण्यात आलेल्या आरशातून ही सूर्यकिरणं पुन्हा ९० अंशात परावर्तित होतील.

यानंतर गाभाऱ्यातल्या आरशात हे सूर्यकिरण परावर्तित होतील आणि रामलल्लाच्या मूर्तीवर ७५ मिमिचा गोलाकार सूर्यतिलक दिसेल. दुपारी १२ वाजता रामललल्लाच्या मूर्तीवर हा सूर्यतिलक सोहळा पाहता येईल. चार मिनिटांपर्यंत सूर्यतिलक सोहळा रंगणार आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.

हे पण वाचा- Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

किती वाजता रंगणार आहे हा सोहळा?

आज दुपारी बारा वाजता हा सोहळा रंगणार आहे. जो चार मिनिटं चालणार आहे. सूर्यतिलक सोहळा आजपासून दर रामनवमीच्या दिवशी साजरा होणार आहे. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ही पहिलीच रामनवमी आहे ज्यादिवशी हा खास सोहळा रंगणार आहे.

राम मंदिर ट्रस्टने काय म्हटलं आहे?

राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रांनी म्हटलं आहे सूर्य तिलक सोहळा सुरु झाल्यानंतरही भक्तांना राम मंदिरात जाण्याची संमती देण्यात येईल. मंदिर ट्रस्टने हा सोहळा भक्तांना पाहता यावा म्हणून १०० एलईडी स्क्रिन लावले आहेत. तर मोदी सरकारने ५० एलईडी स्क्रिन दिले आहेत. एकूण १५० स्क्रिनवर भक्तांना हा सोहळा रांगेत असतानाही पाहता येणार आहे.