परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हजरजबाबीपणाची गोष्टच वेगळी आहे. ट्विटवर खूपच सक्रिय असणाऱ्या स्वराज यांना अनेकदा काही लोक ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात खरं. पण स्वराज त्यांना अशी काही उत्तरं देतात की त्यांच्या हजरजबाबीपणाचं फारच कौतुक वाटतं. तसं बरेचदा व्हिसाच्या काही समस्या असतील तर लोक ट्विट करत स्वराज यांची मदत मागतात. त्यादेखील लगेच मदतही करतात, तेव्हा सदैव तत्पर असणाऱ्या सुषमा स्वराज अनेकांसाठी आदर्श आहेत. पण काहीजण असेही आहेत की ट्विटवर त्यांची टर उडवण्याचा प्रयत्न करतात. पण स्वराज यांची कोणीही कितीही फिरकी घेण्याचा प्रयत्न केला तरी त्या असं काही उत्तर देतात की समोरचा एकदम गप्पच बसतो.

Viral Video : ही कोंबडी चक्क पियानो वाजवते…

आता हेच बघा ना एका दीड शहाण्याने ‘मी मंगळावर अडकलो आहे. ९८७ दिवसांपूर्वी मंगळयानाने मला खाद्य रसद पोहोचवली होती, आती ती संपलीये तेव्हा ‘मंगळयान -२’ पाठवण्याची व्यवस्था कधी करताय?’ असं ट्विट करत त्याने सुषमा स्वराज आणि ‘इस्रो’ या दोघांनाही मेन्शन केलं. काही अवधीतच या तरूणाला स्वराज यांनी असं उत्तर दिलं की त्या उत्तराने त्यांनी सगळ्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली. ”तुम्ही भलेही मंगळावर अडकला असाल तरीही भारतीय दूतावास तिथेही तुमच्या मदतीला धावून येईल’ असं स्वराज यांनी ट्विट केलं.