ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मासिक पाळीच्या काळात ‘टाइम ऑफ पॉलिसी’ आणली आहे. मासिक पाळीच्या काळातही काम करणाऱ्या महिला डिलिव्हरी पार्टनर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. मासिक पाळीच्या काळात महिला डिलिव्हरी पार्टनर्सना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे महिलांवर या काळात परिणाम होत असतात. किंबहुना या काळाच महिलांना काही चढ- उतारांनाही सामोरं जावं लागतं. या काळात महिलांनी खरंतर आराम करणं अपेक्षित असतं, पण काही कारणास्तव म्हणा किंवा नाईलाजानं ते शक्य होत नाही. म्हणूनच सुप्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने नवा बेंचमार्क निर्माण करत ही नवी पॉलिसी आणली आहे. नक्की काय आहे ही पॉलिसी जाणून घेऊयात….

जवळपास ५ लाख कर्मचाऱ्यांच्या बळारव swiggy कडे देशातील लोकप्रिय कंपनी म्हणूनही पाहिलं जातं. कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी या कंपनीची विशेष ओळख आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी ‘नो-क्वेश्चन-आस्कड, टू-डे पेड मंथली पीरियड टाइम-ऑफ पॉलिसी’ची घोषणा केलीय. त्यांच्या या निर्णयाविषयी म्हणावं तर, सर्वच स्तरांतून त्याबद्दल चर्चा सुरु असून, निर्णय़ाचं स्वागत होत आहे. शिवाय इतर कंपन्यांनीही असा निर्णय घ्यावा, अशी मागणी काही स्तरांतून केली जात आहे.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

स्विगी कंपनीचे ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मिहीर शाह यांनी अलीकडेच एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून ही नवी पॉलिसी जाहीर केलीय. यात त्यांनी लिहिलं की, “महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात बाहेर आणि रस्त्यावर फिरताना होणारी अस्वस्थता हे कदाचित सर्वात कमी नोंदवलेल्या तक्रारींपैकी एक आहे.”

पीरियड टाइम-ऑफ पॉलिसी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. या पॉलिसीच्या मदतीने Swiggy मध्ये काम करणाऱ्या महिला दर महिन्याला दोन दिवसांच्या सशुल्क सुट्टीसाठी निवड करू शकतात. जे ‘पेड टाइम-ऑफ’ निवडतात त्यांना किमान कमाईची हमी देखील दिली जाणार आहे. याचा अर्थ असा की, स्विगीमधील महिला डिलिव्हरी पार्टनर्स वर्षातून २४ दिवस ऐच्छिक रजेचा पर्याय निवडू शकतात. या व्यतिरिक्त, स्विगीने महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी कामावर ठेवण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची हमी मिळावी यासाठी ‘सेफ झोन’ आणि चांगल्या स्वच्छता सुविधाां सारखी अनेक स्तुत्य पावले उचलली आहेत. फूड एग्रीगेटर प्लॅटफॉर्मने महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. स्विगीने जाहीर केलेल्या या नव्या पॉलिसीवर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. काही युजर्सनी ट्विटरवर ट्विट करत स्विगीच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर काही युजर्सनी कमेंट्स करत या निर्णयाचं कौतुक केलंय.

इतकंच नव्हे तर ज्या महिलांकडे बाईक नाहीत त्यांच्यासाठी स्विगी कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी पार्टनर्स सोबत काम करत आहे. ज्या महिलांकडे बाईक नाही अशा महिलांना भाड्याने ईव्ही सायकल आणि बाईक देण्यासाठीच्या सुविधेसाठी स्विगी कंपनी काम करतेय. Swiggy मध्ये आतापर्यंत सुमारे एक हजार महिला डिलिव्हरी एजंट आहेत. स्विगीने २०१६ मध्ये पुण्यात महिला डिलिव्हरी पार्टनरचा उपक्रम सुरू केला.