scorecardresearch

Premium

तमन्ना भाटियाच्या ‘या’ ब्लेझरची किंमत ऐकून व्हाल चकित; ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भुरळ!

तमन्नाचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही तिच्या हटके लूकमधले फोटो व्हायरल होत आहेत.

Tamanna-Bhatia
(Photo: Instagram/tamannaahspeaks)

फॅशन आयकॉन आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या फॅशन सेन्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हीने तिचं अभिनय कौशल्य केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर दक्षिणात्य चित्रपटातही आहे. तमन्नाचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही तमन्नाचं प्रकाशझोतात येण्याचं कारण तितकंच युनिक आहे. तमन्ना तिच्या फॅशन सेन्सने कायम चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. यंदाही तिचा नव्या फोटोशूटनं चाहते अवाक झाले आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटियाची इन्स्टाग्राम टाइमलाइन पाहिली की तिच्या एक्लेक्टिक वॉर्डरोबची झलक पहायला मिळते. आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमधून लेटेस्ट फोटोज, विविध स्टाइल स्टेटमेंट्सचे प्रयोग करण्यापासून तमन्ना कधीही मागे हटत नाही. पॉवर ड्रेसिंगला आणखी हटके करत तिने चक्क न्यूड गुलाबी ब्लेझर ड्रेस परिधान केलाय आणि नेटिझन्सला तिच्या अतुलनीय मोहिनीने स्तब्ध केलंय.तमन्नाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोशूटमधील अनेक फोटोज शेअर केले आहेत. तिने मॅई पॅरिसच्या शेल्फमधून एक विचित्र परंतु तितकंच मोहक आणि मादक अंदाजात ब्लेझर ड्रेस परिधान केलाय. कमीतकमी अ‍ॅक्सेसरीज वापरत तिने आपल्या ग्लॅमरस लूक पूर्ण केलाय.दीपिका पदुकोण, तारा सुतारिया आणि नोरा फतेही सारख्या सेलिब्रिटींसोबत काम करणाऱ्या शालिना नाथानी यांनी तिचा हा न्यूड पिंक ब्लेझरची संकल्पना मांडली होती.

student played with bench to hold the rythm on the harmonium played by teacher
Video : शिक्षकाच्या हार्मोनियमवर ठेका धरण्यासाठी विद्यार्थ्याने वाजवला बेंच, गुरू शिष्याच्या जुगलबंदीचा व्हिडीओ एकदा पाहाच
Turn any YouTube video convert into a GIF Just using Three Tools Know The Step By Step
तुमच्या आवडत्या युट्यूब व्हिडीओचे करा GIF मध्ये रूपांतर; फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो
a 45-year-old cyclist Anil Kadsur dies of heart attack
प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?
AB de Villiers on Anushka Sharma’s Pregnancy in Marathi
अनुष्काच्या प्रेग्नेंसीबाबतच्या ‘त्या’ विधानावरुन एबी डिव्हिलियर्सचा युटर्न, माफी मागत म्हणाला, “माझ्याकडून मोठी चुक…”

अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या चाहत्यांना मादक अंदाजातील फोटोज शेअर करत आश्चर्याचा सुखद धक्का देत असते. नुकतंच तिने शेअर केलेला न्यूड पिंक ब्लेझरमधले फोटोज याचाच पुरावा देत आहेत. हा सेक्सी आणि कामुक लूकमधील मोहक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. बॉडीकॉन एन्सेम्बलमध्ये शरीराच्या आकर्षक बांधासह लाइटवेट सूट जॅकेट, प्लगिंग नेकलाइन, वाइड पॉईंट कॉलर आणि लांब बाह्यात तिचा हा ग्लॅमरस लूक झळकताना दिसून येतोय.

तमन्नासारखा लूक पाहून तुम्हालाही असा लूक करण्याची इच्छा आहे का? दरम्यान हा लूक कॉपी करणं तिच्या महिला चाहत्यांसाठी कठीण ठरू शकते. कारण तमन्नाच्या या ड्रेसची किंमत तब्बल ९४ हजार इतकी आहे.अभिनेत्री तमन्नाच्या या ग्लॅमरस लूकमधले फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तमन्नाचा हा अवतार तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. तिने परिधान केलेल्या या सुंदर न्यूड ब्लेझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तिच्या या फोटोंना लाखोंच्यावर लाईक्स मिळाले आहेत. तर तिच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचं आणि फॅशन सेन्सचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tamannaah bhatia in rs 94k nude pink blazer dress stuns with her irresistible charm prp

First published on: 22-09-2021 at 22:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×