ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी नवीन जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र टाटा ग्रुपच्या मालकीच्या दागिण्यांच्या तनिष्क या ब्रॅण्डची नवी जाहिरात सध्या वादात सापडली आहे. दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींच्या लग्नासंदर्भातील भाष्य या जाहिरातीमध्ये करण्यात आल्याने सोशल मीडियावर या जाहिरासंदर्भात अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. एक हिंदू तरुणी लग्न करुन मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्यानंतर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामधील गोष्ट या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र हा लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन #BoycottTanishq ची हाक दिल्यानंतर ही वादग्रस्त जाहिरात कंपनीने मागे घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न करुन गेलेल्या हिंदू तरुणीसाठी तिच्या सासरचे लोकं हिंदू प्रथांप्रमाणे डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतात असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीप्रमाणे सुनेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये या तरुणीचे लग्न झालं आहे. सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही जाहिरात फारशी आवडलेली नाही. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

लव्ह जिहाद हा शब्द हिंदुत्ववादी संघटनांद्वारे आंतर-धार्मिक विवाहासाठी वापरला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार की मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी बळजबरीने किंवा छळ करून स्त्रीयांचे धर्मांतरण होते. या सर्व घटनांनामध्ये महिलांना धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याचा दावा केला जातो. केरळ आणि कर्नाटकमध्ये हिंदू मुलींनी मुस्लिम तरुणांशी लग्न केल्याचे प्रकार काही वर्षापूर्वी समोर आले तेव्हा लव्ह जिहादचा वापर पहिल्यांदा करण्यात आला होता. ही जाहिरात म्हणजे लव्ह जिहादचाचा प्रकार असल्याचा आरोप करत अनेकांनी तनिष्कवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरुन केली आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

थेट कंपनीच्या प्रोडक्टवरच बहिष्कार टाकण्याची मागणी होत असल्याने कंपनीने ही जाहिरात मागे घेतली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanishq withdraws ad on hindu muslim couple after outrage on twitter with boycott tanishq scsg
First published on: 13-10-2020 at 10:49 IST