चीनमधील एका विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे एक चायना इस्टर्न पॅसेंजर जेट चीनच्या नैऋत्य भागामध्ये क्रॅश झाले आहे. दरम्यान, मृतांची आकडेवारी अद्याप कळू शकलेली नाही. बोईंग ७३७ विमान वुझोउ शहर, गुआंग्शी प्रदेशाजवळील ग्रामीण भागात क्रॅश झाले आणि त्याला आग लागली. घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात आली आहेत,  अशी माहिती राज्य प्रसारक सीसीटीव्हीने सोमवारी दिली.

कुनमिंगहून ग्वांगझूला १३३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला आणि आग लागली. अपघात झालेले जेट हे बोईंग ७३७ विमान होते आणि मृतांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. दरम्यान, या विमानाच्या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बघता बघताच हे विमान थेट जाऊन एका पर्वतावर कोसळलं आणि नंतर पर्वताला आज लागली.

pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

बोईंग ७३७ हे विमान कुनमिंग शहरातून ग्वांगझूला जात असताना त्याचा गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराशी संपर्क तुटला, असे चीनच्या नागरी उड्डाण प्रशासनाने सांगितले. वुझोऊजवळील टेंग काउंटीमध्ये विमान कोसळले आणि डोंगराला आग लागली. वृत्तानुसार, बचाव कर्मचार्‍यांना या विमानात अद्याप तरी कोणीही जीवंत आढळलेलं नाही.

मोठी बातमी! चीनमध्ये १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले, टेकडीवर लागली भीषण आग

हे विमान त्याच्या शेवटच्या काही सेकंदात पर्वतावर कोसळण्यापूर्वी प्रचंड वेगाने खाली जाताना दिसले. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार, विमानतळ कर्मचार्‍यांनी सांगितले की, ईस्टर्न चायना फ्लाइट MU5735 गुआंगझूमध्ये त्याच्या निर्धारित वेळेवर निर्धारीत ठिकाणी पोहोचली नाही.