scorecardresearch

Premium

TCS ची मोठी भरारी; ‘या’ कंपनीला मागे टाकत जागतिक स्तरावर गाठले महत्त्वाचे स्थान

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि इन्फोसिससह, आयटी क्षेत्रातील इतर चार मोठ्या भारतीय कंपन्यांनी जागतिक स्तरावरील टॉप २५ कंपन्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

tcs ie
टीसीएस गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी तर २०२०च्या तुलनेत २४ टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आली आहे. (Photo : Indian Express)

ब्रँड फायनान्स या जगातील आघाडीच्या ब्रँड व्हॅल्युएशन फर्मनुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही जागतिक स्तरावर आयटी सेवा क्षेत्रातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. ब्रँड व्हॅल्युएशन फर्मने सांगितले की इन्फोसिस (Infosys) ही कंपनी या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यासह, आयटी क्षेत्रातील इतर चार मोठ्या भारतीय कंपन्यांनी टॉप २५ कंपन्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

टीसीएस आणि इन्फोसिस सोबतच विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि एलटीआय या कंपन्यांचा या लिस्टमध्ये समावेश आहे. या कंपन्या अनुक्रमे सातव्या, आठव्या, पंधराव्या आणि २२व्या स्थानावर आहेत. २०२० ते २०२२ दरम्यान भारतातील आयटी कंपन्यांनी ५१ टक्क्यांनी वाढ केली तर अमेरिकेच्या आयटी कंपन्यांचे ब्रँड सात टक्क्यांनी खाली आले. रिपोर्टनुसार, अमेरिकेची आयबीएम कंपनी चौथ्या स्थानावर आली असून टीसीएस गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी तर २०२०च्या तुलनेत २४ टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आली आहे. टीसीएसचे ब्रँड मूल्य १६.८ अरब डॉलर आहे.

Persistent, IT company, Anand deshpande
वर्धानपनदिन विशेष : पुण्यातील तंत्रज्ञान क्षेत्राचे रूप पालटणारा ‘आनंद’
hidden charges on loans
विश्लेषण : कर्जावरील छुप्या शुल्काला आता प्रतिबंध? काय आहे ‘केएफएस’? बँका, वित्तीय कंपन्यांसाठी ते बंधनकारक का?
job cuts in indian airlines spicejet to lay off 1000 employees
भारतीय विमान कंपनीतही नोकरकपातीचे वारे; ‘स्पाईसजेट’कडून हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड 
gobi manchurian banned in goa news in marathi, gobi manchurian marathi news, gobi manchurian goa marathi news
Gobi Manchurian Ban : गोबी मंच्युरिअरनवर गोव्यातील काही शहरांमध्ये बंदी का?

LIC च्या या योजनेत एकदाच गुंतवणूक करून महिन्याला मिळणार १२ हजार रुपये पेन्शन; जाणून घ्या तपशील

टीसीएसने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, या वाढीचे श्रेय कंपनीच्या ब्रँड आणि कर्मचाऱ्यांमधील गुंतवणूक आणि मजबूत आर्थिक कामगिरीला जाते. कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी राजश्री आर यांनी सांगितले, हे रँकिंग कंपनीसाठी एक मैलाचा दगड आहे. ही रँकिंग कंपनीची बाजारातील वाढती प्रासंगिकता आणि ग्राहकांसाठीचे तिचे नावीन्य आणि बदल यांची पुष्टी करते.

याव्यतिरिक्त या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारी इन्फोसिस कंपनी जगातील सर्वात वेगाने वाढणारा आयटी सेवा प्रदाता ब्रँड म्हणून उदयास आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू ५२ टक्क्यांनी आणि २०२०च्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढून १२.८ अरब डॉलर झाले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The big leap of tcs achieved an important position in the world pvp

First published on: 27-01-2022 at 14:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×