कोरोना महामारीनंतर घरातून काम करण्याची म्हणजेच ‘वर्क फॉर्म होम’ कामाची नवी प्रणाली उदयास आली आहे. त्यामुळे अनेकजण आजही घरातून काम करत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सवय लागली होती, अशातच आता कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करायला सांगत आहेत. परंतु, अनेक कर्मचार्‍यांची तब्येत बिघडल्यामुळे किंवा कठीण परिस्थितीत WFH हा योग्य पर्याय असतो. सध्या असाच एक कर्मचारी, जो एका आठवड्यापेक्षा जास्त काळ आजारी पडल्यानंतर ऑफिसमध्ये परतला होता, तेव्हा त्याच्या बॉसने WFH सुविधा रद्द केली आणि त्याला थेट कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली आहे. बॉसच्या धमकीमुळे कर्मचाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर कर्मचाऱ्याने त्याच्याबरोबर घडलेली सर्व घटना Reddit वर शेअर केली, ज्यामध्ये त्याने ऑफिसमधील खराब वातावरणाबद्दल सांगितले आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र, बॉसने कर्मचाऱ्यावर त्याला नोकरीतील साधी कामेही करता येत नसल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्याने लिहिलं की, मी आजारपणातून बरा झाल्यानंतर एका आठवड्यानंतर ऑफिसमध्ये गेलो, त्यानंतर माझ्या बॉसने मला ईमेल केला आणि एक मीटींग करायची असल्याचं सांगितलं. मी मिटींग जॉईन केली त्यावेळी बॉसने मी साधी कामेही करू शकत नाही अशी तक्रार केली. तसेच त्याने यावेळी मी कामात हालगर्जीपणा करतो असा आरोपही केला आणि सांगितले की, यापुढे मला घरून काम करता येणार नाही. या कर्मचाऱ्याने पुढे लिहिलं, “आता मला नवीन नोकरी शोधण्याच्या प्रक्रियेला गती दिली पाहिजे कारण मला फक्त एक पत्र लिहायचे आहे, ते म्हणजे “मला नोकरीवरुन काढून टाकलं आहे.”

हेही वाचा- बायकोच्या शिक्षणासाठी शेती विकली, लाखो रुपयांचं कर्जही काढलं; सब इन्स्पेक्टर बनताच तिने नवऱ्यासह मुलांनाही सोडलं

ऑफिसमध्ये आल्यानंतर कर्मचाऱ्याला जी वागणूक मिळाल्या त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असल्याचं सांगितलं. तो लिहितो “असे वाटते की दररोज मला या मीटिंगमध्ये मुद्दाम ओढले जाते आणि सांगितले जाते की, मी मूर्ख आहे, मी निरुपयोगी आहे आणि माझे भविष्य धोक्यात आहे. मला हरवल्यासारखे वाटते आणि प्रामाणिकपणे मला दुसरे काय करावे हे मला कळत नाही. जेव्हा मी येथे असतो तेव्हा मी उदास असतो आणि सतत तणावात असतो कारण माझ्यावर नेहमी नजर ठेवली जाते. त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “आज माझी एक मुलाखत आहे आणि मला आशा आहे की मला तिथे जागा मिळेल, कारण मी नरकात आहे असा अनुभव करुन करुन आता थकलो आहे.”

हेही पाहा- उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी अनोखा जुगाड, कर्मचाऱ्याने घातलेल्या फॅन शर्टचा Video पाहून थक्क व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचाऱ्याची ही पोस्ट व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी त्याला सहानुभूती व्यक्त करून आणि चांगली नोकरी शोधण्याचा सल्ला दिला आहे.
एका युजरने लिहिले, “तुम्हाला माहिती झाले आहे की, तो बॉस तुमच्या लायकीचा नाही.” दुसर्‍याने लिहिले, “खरं सांगायचं तर, तुम्ही तुमच्या बॉसमध्ये वाईट संबंध आहेत. शिवाय त्याने तुम्हाला तुम्ही बेकार आहात हे जाणवून दिले आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त काम देऊ शकतो, त्याला माहिती आहे की तुम्हाला जायचं नाही, त्यामुळे त्याला दोन आठवडे सुद्धा देऊ नका, तुमची पुढची नोकरी ठरवा आणि शुक्रवारी दुपारच्या जेवणासाठी बाहेर जा आणि परत येऊ नका.”