लग्नाची तारीख जसं जशी जवळ येते तशी कुटुंबीयांची धावपळ सुरु होते. आई वडिलांसोबत नातेवाईक पत्रिका, कपडे, आमंत्रण, खाणं पिणं याची तजवीज करण्यासाठी व्यस्त होतात. लग्न उद्यावर येऊन ठेपल्यानंतर वऱ्हाडी मंडळींना काय कमी पडू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. मात्र उत्तर प्रदेशातील कौशल्यानगरमधील लग्नाच्या एका प्रकरणामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी वर शोधून लग्न निश्चित केले होते, पण त्यांच्या पदरी निराशा पडली. लग्नाच्या एक दिवसाआधी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. एवढंच नाही तर पळण्यापूर्वी तिने दिलेला चहा पिल्याने कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

घरात लग्नाच्या तयारीत व्यस्त असलेल्या कुटुंबीयांना मुलीने गुंगीचं औषध टाकून चहा पाजला. हा चहा प्यायल्याने कुटुंबीय बेशुद्ध झाले. यानंतर नववधूने घरात ठेवलेले पैसे आणि दागिने घेऊन प्रियकरासह पळ काढला. घरातील सदस्य शुद्धीवर आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. चहा प्यायल्यानंतर काही जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. जवळपास दीड लाख रोख आणि दागिने घेऊन मुलगी फरार झाल्याचा आरोप वधूच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात फोन देत असाल तर सावधान; एका पालकाचं इतक्या रुपयांचं नुकसान

वरात दारात आल्यानंतर वराला ही बातमी ऐकून धक्काच बसला. अशा परिसथितीत मुलीच्या कुटुंबीयांनी लहान बहिणीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. मात्र वराने नकार देत प्रस्ताव धुडकावून लावला. मात्र कुटुंबीयांनी हातापाया पडून वराची समजूत काढल्यानंतर त्याने लग्न करण्यास होकार दिला. शेवटी वधूच्या छोट्या बहिणीसोबत वराने लग्न केलं. इतकंच नाही नाही पळून गेलेल्या मुलीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पळून गेलेल्या मुलीचे कौशल्यानगर येथील मुलासोबत प्रेमसंबंध होते, असं सांगण्यात येत आहे.