सोशल मीडिया हे अत्यंत प्रवाभी माध्यम मानले जाते, ज्याचा वापर करून अनेक जण रातोरात सेलिब्रिटींप्रमाणे प्रसिद्ध झाले. ज्यांना पूर्वी कोणी ओळखत नव्हते त्यांना जग ओळखू लागले. प्रसिद्धीबरोबरच भरपूर पैसा कमवण्याच्या संधी निर्माण झाल्या, त्यामुळे हल्लीची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करताना दिसते. यातही इन्स्टाग्रामवरील रिल्ससाठी काही जण काहीही करायला तयार असतात. काहीवेळा व्हिडीओसाठी लोक असे काही वागतात, ज्यामुळे स्वत:हून संकटांना आमंत्रण देतात. याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक तरुण मित्रांसह घराच्या छतावर व्हिडीओ शूट करत असतो. यावेळी अॅक्टिंग करताना त्याचा तोल जातो आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे तुम्हीच पाहा, या व्हिडीओचा शेवट इतका धोकादायक आहे की पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक घराच्या गच्चीवर रील व्हिडीओ शूट करण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी त्यातील दोन तरुण एका बॉलीवूड गाण्यावर नाचत रिल्स बनवत असतात. पण, डान्स स्टेप्स करत असतानाच यातील एक तरुण गच्चीच्या टोकापर्यंत येतो आणि तोल जाऊन अचानक खाली कोसळतो. नुसताच खाली कोसळत नाही तर एका वायरमध्ये अडकून झाडावर आपटतो आणि खाली पडतो. चांगली गोष्ट म्हणजे इतक्या उंचावरून पडल्यानंतरही त्याला कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. कारण व्हिडीओमध्ये तो पडल्यानंतर काही सेकंदातच उभा राहतानाही दिसत आहे. पण, अशा प्रकारे निष्काळजीपणे रील बनवणे कोणासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशाप्रकारे रिल्स तयार करण्यासाठी स्वत:चे प्राण धोक्यात घालू नका, असा सल्ला अनेकांकडून दिला जात आहे.
रील के चक्कर में ऐसा एक्सीडेंट ??#वायरलविडियो pic.twitter.com/r0K79uKfLu
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— JITU YADAV (@JittuSingh0) May 18, 2024
हा व्हिडीओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) @JittuSingh0 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रीलच्या नादात असा झाला अपघात.’ दरम्यान, हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर अनेकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, हे खूप जीवघेणे आहे. आणखी एका युजरने लिहिले की, रीलचा नाद. तिसऱ्या एका युजरने खोचकपणे लिहिले की, अजून बनवा रिल्स. अशाप्रकारे रिल्सच्या नादात आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांना लोकांनी चांगलेच सुनावले आहे.