Viral Video:राणीच्या बागेत, नॅशनल पार्कमध्ये जाण्याचा हट्ट असतो तो फक्त वाघ, सिंह या प्राण्यांना बघण्यासाठीच. राणीच्या बागेत, नॅशनल पार्कमध्ये या प्राण्यांनी नागरिकांना कोणतेही नुकसान पोहचवू नये म्हणून अनेक सुरक्षा येथे केलेल्या दिसून येतात. तसेच जंगलाचा राजा सिंह फक्त जंगलातच पाहायला मिळेल असा समज आज तुमचा चुकीचा ठरेल. कारण आज व्हायरल व्हिडीओत एका व्यक्तीने बहुदा स्वतःच्या घरात एक सिंह पाळला आहे. तर दुसरी व्यक्ती हे पाहून सिंहाला गोंजारायला जाते व असं करणे त्याला चांगलंच महागात पडलं आहे.
जंगलातील प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला नेहमीच सल्ला दिला जातो. भीती किंवा उत्साहामुळे ते आक्रमकपणे प्रतिक्रिया देऊ शकतात. तर व्हायरल व्हिडीओत सुद्धा असंच पाहायला मिळालं आहे. व्हिडीओत सिंहाला पट्ट्याने बांधून ठेवले होते. एक तरुण येतो आणि सिंहाला कुरवाळण्यास सुरुवात करतो. कैदेत ठेवलेल्या सिंहाला राग येतो व तो पटकन उठून उभा राहतो आणि तरुणाच्या अंगावर झडप टाकतो. हे पाहून तरुण घाबरतो आणि पळ काढण्यास सुरुवात करतो. नक्की पुढे काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पट्ट्याने बांधलेल्या सिंहाला तरुण कुरवाळायला जातो. तेव्हा सिंह तरुणाच्या अंगावर धावून जातो. या गडबडीत सिंहाला बांधलेला पट्टा सुटतो. तरुण पळ काढतो तेव्हा सिंह पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण, नंतर दुसरा तरुण सिंहाला पकडत आणि नियंत्रणात आणतो आणि सिंहाला कुरवाळणारा तरुण तेथून पळ काढतो. सिंहाला कुरवाळणे व्यक्तीला चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले आहे असे म्हणायला हरकत नाही.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @FAFO_TV या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही जण मजेशीर तर काही जण व्यक्तीला लकी म्हणत आहेत. तर अनेक जण व्यक्तीची चिंता देखील व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच घाम फुटला असेल. माणसाला जसा आनंद होतो, दुःख होते तसंच प्राण्यांनाही होतो फक्त त्यांची भावना व्यक्त करण्याची पद्धत आपल्यापेक्षा थोडी निराळी असते. त्यांना माणसांपासून धोका नाही हे जेव्हा त्यांना कळते तेव्हा ते आपल्यावर कोणताही हल्ला करत नाहीत किंवा आपल्याला इजा पोहचवत नाहीत. पण, खोड काढायची म्हणून प्राण्यांना दिलेला त्रास त्यांनाही बहुदा कळतं असेल. याच उदाहरण या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे.