Viral Video: शहरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून अनेक जण पचायला हलकं अन्न तर सतत थंड पेय पिण्यास प्राधान्य देतात. पण, तुम्ही एकाचवेळी किती ग्लास सरबत किंवा ज्यूस एका घोटात पिऊ शकता. जास्तीस्त जास्त अर्धा ग्लास… बरोबर ना. तर आज एका व्यक्तीने त्याचे अजबच कौशल्य दाखवले आहे. आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क एका व्यक्तीने एक लिटर लिंबाचा रस अवघ्या १५ सेकंदात पिऊन दाखवला आहे.
गिनीज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद होण्यासाठी लोक इतकं काय करतात की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तसंच आज एका परदेशात राहणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा केलं आहे. स्ट्रॉच्या मदतीने एका व्यक्तीने एक लिटर लिंबाचा रस एका घोटात पिऊन दाखवला आहे. बटर ठेवलेल्या एका प्लास्टिकच्या बाटलीवर एका मोठ्या भांड्यात लिंबाचा रस ओतला आहे. त्यानंतर वेळ सुरू होताच व्यक्ती सरबत पिण्यास सुरुवात करते. बघता बघता व्यक्ती एका घोटात लिंबाचा रस पिते. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…लै भारी दोस्ती! एक टिश्यू पेपर अन् विमान साक्षीदार; दोन मित्रांच्या मैत्रीची गोष्ट VIDEO तून पाहा
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अवघ्या १५ सेकंदात व्यक्तीने एक लिटर लिंबाचा रस पिऊन दाखवला आहे. डेव्हिड रश असे या व्यक्तीचे नाव आहे. डेव्हिड रश जेव्हा ३६ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी १२० पेक्षा जास्त ब्लूबेरी खाल्ल्या होत्या. एक लिटर लिंबाचा रस १५ सेकंदात पिण्यापूर्वी त्यांनी प्रथम एक लिटर पाणी पिण्याचादेखील सराव केला.
तसेच रेकॉर्डसाठी प्रयत्न करण्यापूर्वी, डेव्हिड यांनी आणखीन चार गोष्टींची तयार केली, ती म्हणजे १) श्वासोच्छवासाचा प्रयोग करणे, २) हा टास्क सुरू होण्याआधी बसायचं की उभं राहायचं हे ठरवणे, ३) स्वतःचे शरीर कोणत्या स्थितीत ठेवायचे याचा विचार करणे आणि ४) सरबत पिताना कसं प्याव”; आदी गोष्टींचा सराव करून ते गिनीज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद करण्यात यशस्वी झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “एक लिटर लिंबाचा रस एका स्ट्रॉमधून पिण्याचा सर्वात जास्त वेग”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.