सोशल मीडियावर कर्मचारी आणि त्याच्या बॉसशी किंवा ऑफिसशी संबंधित अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. यामध्ये कधी बॉसने काम करण्यासाठी टाकलेला दबाव तर कधी ऑनलाईन मिटींगमधील मजेदार किस्से अशा गोष्टींचा समावेश असतो. पण सध्या Reddit प्लॅटफॉर्मवर एका कर्मचाऱ्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे अनेक लोक संतापले आहेत. कारण या पोस्टमध्ये वापरकर्त्याने दावा केला की, त्याच्या कंपनीने इतर कर्मचार्‍यांना धडा शिकवण्यासाठी टॉप परफॉर्मर कर्मचार्‍याला कामावरुन काढून टाकलं आहे.

Reddit वापरकर्त्याने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कंपनीने एका टॉप परफॉर्मन्स करणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकले आहे, शिवाय त्यांना फक्त आपण कोणालाही कामावरुन काढून टाकू शकतो हे दाखवण्यासाठी त्यांनी असं केलं आहे.” वापरकर्त्याने या घटनेबद्दल पुढे सविस्तरपणे सांगितलं आहे.

हेही वाचा- कमाईतील ५० टक्के रक्कम सरकारला देण्यासाठी दिवसातील १२ तास राबतोय…, बंगळुरुमधील कर्मचाऱ्याचे ‘ते’ ट्विट Viral

त्याने लिहिलं की, प्रामाणिकपणे सांगायचे तर, माझ्या सध्याच्या नोकरीमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत, ज्यामध्ये उच्च व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे कमिशन चोरणे, कराराच्या अटींचा आदर न करणे, तसेच जर आम्ही बाथरूममध्ये ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवला तरी आम्हाला वाईट वागणूक देणे अशा गोष्टींचा समावेश आहे, ज्या आम्हाला आवडत नाहीत.

Company fired a top performer to show us that they can fire anybody at will
by inantiwork

त्याने पुढे लिहिलं, “कंपनीने एका सहकाऱ्याला कामावरुन काढून टाकलं जो उत्कृष्ट कामगिरी करणारा होता.” तसेच त्याने असा दावा केली की, कंपनीच्या व्यवस्थापकाने आम्हाला सांगितले की, या कर्मचाऱ्याला एक उदाहरण म्हणून काढून टाकले, कारण आम्ही कमिशन किंवा कराराचा भंग यांसारख्या गोष्टींबद्दल व्यवस्थापनाशी भांडू नये, कारण आम्ही त्याच्या इच्छेविरुद्ध गेलो तर ते आम्हालााही कामावरुन काढू शकतात,”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कर्मचाऱ्याने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी कंपनीच्या या कृतीला ‘अयोग्य’ असल्याचं म्हटलं आहे. तर एका वापरकर्त्याने लिहिलं की, “त्यांनी टॉप परफॉरमरला काढून टाकले कारण ते त्याचे मोठे कमिशनचा चेक चोरू शकतील आणि त्याचा उपयोग बाकीच्या कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी करतील,” तर दुसऱ्याने लिहिले “नवीन नोकरी शोधण्याची वेळ आली आहे.”