सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात प्राणी, पक्ष्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कावळा रस्त्यावरून जात असलेल्या उंदराचा जीव वाचवताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये एक कावळा रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या उंदराला मदत करताना दिसत आहे. कारण जराशी चूक उंदराच्या जीवावर बेतली असती. त्यामुळे कावळा उंदराला रस्ता ओलांडू देत नाही. त्याची शेपटी चोचीने पकडून त्याला मागे खेचत असल्याचं दिसत आहे. कावळ्याचे प्रयत्न पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहे. मित्र असावा तर असा अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जो तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो, तोच तुमचा खरा मित्र असतो.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून लोकांची पसंती मिळत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स त्यांच्या आयुष्यातील वाईट टप्पा आठवत आहेत. तसेच पाठीशी उभे राहिलेल्या मित्रांची आठवण काढत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आणि पाच हजारांच्या जवळपास लाईक्स मिळाले आहेत.