Viral Video: वाहनांची तपासणी करणे किंवा रेल्वेस्थानकाबाहेर किंवा विविध परिसरात वाहने उभी केली जाऊ नयेत यासाठी पार्किंग होत असलेल्या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात येतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती उड्डाणपुलावरून गाडी चालवते आहे आणि गाडी चालवताना तिच्या वाहनाबरोबर पोलिसांचे बॅरिकेडसुद्धा ओढत घेऊन जाताना दिसते आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दिल्लीचा आहे. अज्ञात व्यक्ती दिल्लीच्या एका उड्डाणपुलावरून गाडी चालवते आहे. तसेच ही गाडी अगदी वेगात जाते आहे आणि या गाडीला डाव्या बाजूला दिल्ली पोलिसांचे बॅरिकेडसुद्धा आहे. गाडीचालक त्याच्या गाडीबरोबर दिल्ली पोलिसांचे बॅरिकेड ओढून घेऊन जात असल्याचे दिसत आहे; जे अगदीच थक्क करणारे आहे. बॅरिकेड विशेषतः गाडीचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी लावले जातात. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…आम्ही शेतकरी! हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी हा जुगाड कामी येईल, शेतकरी तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

उड्डाणपुलावरून ओढत नेले दिल्ली पोलिसांचे बॅरिकेड :

अज्ञात गाडीचालक मारुती सुझुकी स्विफ्ट कार उड्डाणपुलावरून घेऊन जात आहे. पोलिसांनी या कृत्याला जबाबदार असणाऱ्या गाडीचालकावर काही दंडात्मक कारवाई केली की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. बेपर्वाईने वाहन चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे आणि बेदरकारपणे वाहन चालवणे याला प्रतिबंध म्हणून पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात येतात. पण, इथे गाडीचालक स्वतःच बॅरिकेड आपल्या गाडी बरोबर घेऊन जाताना दिसतो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बराच वेळ बॅरिकेड गाडीबरोबर ओढून नेल्यानंतर रस्त्यावर बॅरिकेड घासले जात आहे. दिल्लीच्या याच फ्लायओव्हरवर प्रवास करणाऱ्या गाडीचालकाने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @safecardindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच अज्ञात गाडीचालक व्यक्तीचे हे दृश्य पाहून अनेक जण हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून काही जण संताप; तर काही जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत.