Viral Video : काही जणांसाठी कुटुंब हे सर्व काही असते. काही जणांना आयुष्यातील प्रत्येक क्षण कुटुंबातील सदस्यांसोबतच आनंदाने घालवायचा असतो. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पदवीप्रदान समारंभावेळी लहान बहिणीला मोठ्या बहिणीची खूप जास्त आठवण येत असते. तेव्हा अचानक मोठी बहीण कॉलेजमध्ये येऊन लहान बहिणीला सरप्राईज देते.
व्हायरल व्हिडीओ एका कॉलेजचा आहे. एका कुटुंबातील सगळ्यात लहान मुलीचा कॉलेजमध्ये पदवीप्रदान समारंभ असतो. पण, या कार्यक्रमादरम्यान लहान बहीण तिच्या मोठ्या बहिणीची खूप जास्त आठवण काढत असते. या खास क्षणाला माझ्या मोठ्या बहिणीने सोबत रहावे अशी तिची इच्छा असते.तितक्यात मोठी बहीण मागून येऊन लहान बहिणीला सरप्राईज देते आणि लहान बहीण अगदीच भावुक होते. मोठ्या बहिणीने आपल्या लहान बहिणीला कशाप्रकारे सरप्राईज दिलं एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा…चायनीज खाताय? जरा जपून…हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले
व्हिडीओ नक्की बघा :
बहिणीला दिलं सरप्राईज :
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, कॉलेजमध्ये लहान बहीण पदवीप्रदान समारंभासाठी काळ्या रंगाचा पोशाख घालून उभी असते. तितक्यात मोठी बहीण मागून येते आणि लहान बहिणीला सरप्राईज देते ; हे पाहून लहान बहीण अगदीच भावुक होते आणि गुडघ्यावर बसून रडायला लागते आणि बहिणीला मिठी मारते. कुटुंबातील मोठी बहीण शिक्षणासाठी दुसऱ्या देशात राहते. पण, लहान बहिणीच्या पदवीप्रदान कार्यक्रमाला मोठी बहीण आवर्जून येते आणि बहिणीला खास सरप्राईज देते, हे पाहून लहान बहीण भावुक होऊन रडायला लागते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @magicallynews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतील बहिणीचं प्रेम पाहून तुम्हीसुद्धा काही क्षणासाठी भावुक व्हाल. व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंटमध्ये त्यांचे अनुभव शेअर करताना दिसून आले आहेत. तसेच बहिणीचं प्रेम पाहून विविध शब्दात त्याचं कौतुक करत आहेत.