एकत्र कुटुंब हे मोठं कुटुंब असतं. त्यामुळे या कुटुंबात जास्त सदस्य असतात. त्यामुळे लहान चारचाकी गाडीत या सगळ्यांना एकत्र बसवणं शक्य नसतं. चारचाकी गाडीत चार किंवा पाच सदस्य आरामात बसू शकतात. पण, जास्त लांबचा प्रवास नसेल, तर कुटुंबातील लहान मुलांना आपण अनेकदा मांडीवर घेऊन बसतो किंवा आपण मस्करीत लहान मुलांना अनेकदा म्हणतो की, गाडीत जागा नाही आहे तू डिकीत किंवा गाडीच्या टपावर जाऊन बसू शकतोस… तर आज व्हायरल व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. चारचाकी गाडीच्या डिकीत मुलांना बसण्यासाठी जागा करून, त्याला जाळी लावून घेण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधल्या कराची येथील आहे, असे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. अशातच एक अनोखी गाडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या चारचाकी गाडीची अनोखी रचना करण्यात आली आहे. गाडीच्या डिकीला जाळी लावून, त्या डिकीत तीन लहान मुलांना बसवण्यात आलं आहे. लहान मुलंसुद्धा अगदी न घाबरता मांडी घालून, या तयार केलेल्या खास डिकीत बसली आहेत. या अनोख्या गाडीची रचना एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा…फूटपाथ, भरधाव कार अन् मृत्यू; इतकी भयंकर टक्कर की महिलेचा जागीच गेला जीव! धक्कादायक VIDEO समोर…
व्हिडीओ नक्की बघा :
गाडीच्या डिकीत मुलांसाठी बसायला केली जागा :
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, गाडीच्या डिकीला एक अनोखं रूप देण्यात आलं आहे. डिकीत तीन लहान मुलांना बसवलं आहे आणि मुलांचे चेहरे गाडीच्या दिशेला नसून मागच्या दिशेला असतात. त्यामुळे त्यांचे चेहरे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहेत. तसेच या खास डिकीला जाळी लावण्यात आल्यामुळे ती एखाद्या पिंजऱ्यासारखी दिसते आहे; ज्यात तीन लहान मुलं मांडी घालून बसली आहेत. गाडी रस्त्यावरून जाताना एका अज्ञात गाडीचालकानं त्याच्या फोनमध्ये या गाडीचा व्हिडीओ शूट करून घेतला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @crazyclipsonly या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बघायला मजेशीर; पण थोडा भीतीदायक, असा हा या कुटुंबानं केलेला जुगाड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे; तर काही जण मुलांविषयी चिंता व्यक्त करीत आहेत आणि अनेक जण ही बेस्ट कल्पना आहे, असेसुद्धा कमेंटमधून म्हणत आहेत.