सोशल मीडियावर दररोज विविध गोष्टी व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणाऱ्या असतात तर काही प्रेरणादायी असतात. सध्या बंगळुरुमधील अशीच एक घटना मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. निधी अग्रवाल नावाच्या बंगळुरुमधील एका महिला व्यावसायिकाने एक्स (ट्विटर)वर एका रिक्षा चालकाशी संबंधित एक अप्रतिम आणि इतरांसाठी प्रेरणादायी अशी पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या खूप व्हायरल होत आहे, शिवाय लोक या घटनेतील रिक्षा चालकाचे तोंडभरुन कौतुक करत आहेत.
निधीने ट्विटर पोस्टद्वारे भास्कर नावाच्या रिक्षा चालकाची ओळख करून दिली आहे. तिने लिहिलं आहे की, भास्कर यांनी नुकतेच त्यांच्या प्री-युनिव्हर्सिटी कोर्स (PUC) परीक्षेचा भाग म्हणून इंग्रजीचा पेपर दिला. आश्चर्याची बाब म्हणजे श्री भास्कर यांनी १९८५ मध्ये शाळा सोडल्यानंतर ते आता उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रिक्षा चालकाच्या फोटोसोबत, निधी अग्रवाल यांनी लिहिलं, “माझे @Olacabs ऑटो पार्टनर, भास्कर यांची आज ओळख करून देत आहे. त्यांनी आज इंग्रजीचा पेपर दिला, १९८५ मध्ये १० वी पास झाल्यानंतर ते यावर्षी PUC ची परीक्षा देत आहेत. ते दोन मुलांचे वडील असून त्यांची मुलं तिसरी आणि सहावी इयत्तेत शिकत आहेत. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य खरोखरच प्रेरणादायी होते!”
हेही वाचा- OMG! महिलेच्या मेंदूत आढळली जिवंत अळी, पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का, म्हणाले, “जगातील पहिलीच…”
निधी अग्रवालची प्रेरणादायी पोस्ट इंटरनेटवर अनेकांची मने जिंकत आहे. निधी यांनी रिक्षा चालकाचा फोटो पोस्ट केल्यापासून ते ट्विट हजारो लोकांनी पाहिलं आहे. या आधाही बेंगळुरूमध्ये कमी पगारामुळे रिक्षा चालकांच्या हालाखीच्या परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवाय व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला होता की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दिलेल्या मोफत बस प्रवासामुळे रिक्षा चांलकांना फटका बसला आहे. भारतातील आयटी शहर अशी ओळख असणाऱ्या बंगळुरुमधी अनेक मनोरंजक कथा व्हायरल होत असतात. मार्चमध्ये, अशाच एका ट्विटर वापरकर्त्याने उबर रिक्षा चालकावर एक पोस्ट शेअर केली होती, जो YouTube इन्फ्लुएन्सर्सची बनायचे होते.
