एचआयव्ही ग्रस्त लोकांना नोकरी मिळणे अत्यंत अवघड असते. काही संस्था आणि संघटना अशा लोकांसाठी काम करत असतात. अशातच आता अशा लोकांसाठी एक कॅफे सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कॅफेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांकडून चालवले जाणारे हे आशियातील पहिले कॅफे आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, या कॅफेचं नाव ‘कॅफे पॉझिटिव्ह’ असे आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी जागरुकता निर्माण करणे आणि रोजगार निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. हे कॅफे आनंदघर स्वयंसेवी संस्था चालवते. कल्लोल घोष यांनी त्याची स्थापना केली आहे. ही एनजीओ अपंग मुले आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करते.

भारतीय चलनाबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का? जाणून घ्या काही रंजक बाबी

कल्लोल घोष म्हणतात की त्यांना फ्रँकफर्टमधील एका कॅफेपासून प्रेरणा मिळाली, जी पूर्णपणे एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक चालवतात. ज्या ठिकाणी हे कॅफे सुरु करण्यात आले आहे ते ठिकाण कॉफी आणि सँडविचसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बहुतांश वेळा नोकरदार लोकांची व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते.

Video : गोष्ट असामान्यांची : शाहिरीतून अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यासाठी धडपडणारा स्वप्निल शिरसाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घोष सांगतात की भारतात असे ३० कॅफे उघडण्याची त्यांची योजना आहे. अशा परिस्थितीत त्यांनी प्रशिक्षणासाठी ८०० जणांची निवड केली आहे. ते सांगतात की, सुरुवातीला कॅफे उघडताना तो चालणार नाही अशी भीती त्यांच्या मनात होती. मात्र, आता लोक या कॅफेमध्ये यायला लागले आहेत. येथे काम करणारे लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यावरही काहीजण या कॅफेमध्ये थांबतात तर काही निघून जातात.