सध्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण एक विदेशी तरुणी भारताची सून बनली असून ती आपल्या प्रियकरासाठी सातासमुद्रापार आली आहे. २५ नोव्हेंबरला ती उत्तर प्रदेशाती फतेहपूरला आली आणि बुधवारी रात्री कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. सध्या या देशी नवरा आणि विदेशी नवरीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर अनेक नेटकरी या दोघांचे अभिनंदन करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ललौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दतौली गावात नेदरलँडची मुलगी आल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी परदेशी तरुणीचा पासपोर्टसह इतर कागदपत्रांची तपासणी केली. राधेलाल वर्मा यांना ३६ वर्षीय निशांत वर्मा आणि ३२ वर्षीय हार्दिक वर्मा अशी दोन मुले आहेत. हार्दिक वर्मा ८ वर्षांपूर्वी नोकरीसाठी नेदरलँडला गेला होता. तो इथे एका फार्मास्युटिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता.

प्रियकरासाठी आली सातासमुद्रापार –

कंपनीत काम करत असताना, हार्दिकटी भेट नेदरलँडच्या बार्नेवेल्ड शहरात राहणाऱ्या गैबरीला डुडाशी झाली. भेटीनंतर त्यांचा एकमेकांवर जीव जडला. दोघांनीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर भारतीय प्रियकर आणि परदेशी प्रेयसी गैबरीला डुडाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे तर गैबरीला १५ दिवसांपूर्वी प्रियकरासोबत भारतात आली होती. गुजरातमधील गांधीनगर येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा साखरपुडा केला. हार्दिक वर्माचे वडील राधेलाल वर्मा गेल्या ४० वर्षांपासून गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये राहतात. २६ नोव्हेंबर रोजी राधेलाल कुटुंबीयांच्या उपस्थितीत हळदी समारंभ पार पडला. तर २८ आणि २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोघांचे लग्न धुमधड्याक्यात पार पडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दतौली गावात परदेशी नवरी आल्याची जोरदार चर्चा सुरु झाली, त्यामुळे या बाबतची माहिती मिळताच दतौली पोलीस तपासासाठी तत्काळ लग्नस्थळी दाखल झाले. कारण दतौली गावात नेदरलँडमधून आलेल्या मुलीचे वास्तव्य पोलिस आणि एलआययू कार्यालयाला नव्हते. सकाळी लग्नाची माहिती मिळताच दत्तौली पोलीस तपासासाठी दाखल झाले. तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून परदेशी तरुणीच्या पासपोर्टसह महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली. दरम्यान, विवाह सोहळा सुखरुप पार पडल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. तसंच नेदरलँडला पोहोचल्यानंतर दोघेही कोर्ट मॅरेज करणार असल्याचही त्यांनी सांगितलं.