Viral video: आज देशभरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात. ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात. सोबतच या दिवशी इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम समाजात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. ज्याला बकरी ईद म्हणतात. विशेष म्हणजे यासाठी घेण्यात येणारा प्राणी कष्टाच्या पैशांनी घेण्यात यावा, म्हणजेच चुकीच्या पद्धतीने कमवलेल्या पैश्यातून घेतलेला नसावा असं म्हंटलं जातं अशातच बकरी ईद निमित्त एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये बकऱ्याची कुर्बानी देण्यासाठी घेऊन आलेल्या बकऱ्याच्या गळ्यात पडून हा चिमुकला रडत आहे. याचा व्हिडीओही व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल…

लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. लहान मुलांमध्ये अत्यंत निरागस प्रेम पाहायला मिळतं किंबहुना लहान मुलं घरात चैतन्य निर्माण करतात. लहान मुलं आणि प्राण्यांमधील नातंही फार वेगळं असतं. प्राण्यांनाही लहान मुलांमधील निरागस भावना कळते आणि तेही लहान मुलांवर तसंच प्रेम करतात. या रडणाऱ्या बकऱ्याचा हा व्हिडिओ बकरी ईदशी संबंध असल्याचे म्हणत व्हायरल होत आहे. या बकरी ईदला मालक बकरा विकण्यासाठी आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुर्बानीसाठी घेऊन आलेल्या बकऱ्याला मिठी मारून हा चिमुकला रडतोय. यावेळी त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहियेत, बकऱ्याला त्यानं घट्ट पकडून ठेवल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ bhannat_marathii नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “लहान मुलांना कळतंय पण मोठ्यांना नाही ” तर आणखी एकानं, “देवा हे सगळं कधी थांबणार” अशी प्रतिक्रिया दिली आहे.