सोशल मीडिया आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकजण सोशल मीडियावर तासन तास इन्टाग्राम रिल्स आणि युट्युब शॉट्सचे व्हिडीओ पाहण्यात घालवतो. एवढंच काय अनेकजण कोणतेही नवीन गाण ट्रेंड व्हायला लागले की लगेच व्हिडीओ करुन पोस्ट करत असतात. सध्या असेच गाण सोशल मीडियावर चर्चेत आहे ते म्हणजे.. ”बादल बरसा बिजुली”. आता या गाण्यावर तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडीओ पाहिले असतील, अनेकांचे डान्स पाहिले असतील. पण सध्या एका चिमुकल्याचा या गाण्यावरील डान्स चर्चेत येत आहे. चिमुकल्याचा डान्स पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल.

हेही वाचा – Viral Video : आईच्या लग्नामध्ये लेकाने लावली हजेरी; सावत्र वडिलांना म्हणाला, ”तुम्ही…

व्हिडीओ एका शाळेतील असल्याचे दिसते. एक चिमुकला शाळेच्या गणवेशामध्ये स्टेजवर नाचत आहेत आणि खाली उभे असलेले विद्यार्थी देखील उत्साहाने नाचताना दिसत आहे. ‘बादल बरसा बिजुली’ या गाण्यावर एक चिमुकला जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. चिमुकल्याचे हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. चिमुकल्याला त्याचे मित्र प्रोत्साहन देताना दिसत आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकही डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक आहेत ‘या’ मुंग्या; ब्रिटनवर करणार हल्ला? शास्त्रज्ञांचा इशारा

इंस्टाग्रामवर duskndawn.xo नावाच्या अकांउटवर एका चिमुकल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”आमच्या शाळेतील प्रसिद्ध मुलगा” सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी त्याच्या आत्मविश्वासाचे आणि त्याच्या डान्सचे कौतुक केले आहे. काहींनी हा व्हिडीओ इतका आवडला की त्यांनी तो वारंवार पाहिल्याचे सांगितले. काही जण म्हणाले, ”या गाण्याच्या ट्रेंडचा विजेता आहे मुलगा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बादल बरसा बिजुली” हे एक नेपाळी गीत आहे. काही दिवसांपूर्वी ते सोशल मिडियावर चर्चेत आले.