आजकाल सोशल मीडियावर अनेक कर्मचारी त्यांचे व्यावसायिक जीवनातील अनुभव शेअर करत असतात. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांचा समावेश असतो. यामध्ये सर्वात जास्त पोस्ट नोकरी सोडण्याशी संबंधित असतात. यामध्ये कोणी आपल्या मर्जीने राजीनामा देतो तर कोणी बॉसच्या त्रासाला कंटाळून. पण सध्या एका कर्मचाऱ्याने ऑफिस लांब आहे म्हणून राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.
नुकतेच नवी दिल्लीतील एका कर्मचाऱ्याने नोकरी सोडण्याचं कारण शेअर केलं आहे. त्याने सांगितलं की, दररोज ऑफिसला जाण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो, त्यामुळे मी पहिल्याच दिवशी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ही पोस्ट Reddit वर केली आहे. ज्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्याने सांगितलं की, ऑफिस ते घर प्रवास करण्यात खूप वेळ जात आहे. शिवाय घर बदलणे हा पर्याय माझ्यासाठी योग्य नाहीये. तसेच घरी झोपेच्या वेळेव्यतिरिक्त केवळ ३ तासांचाच वेळ मिळतो. तर हा कर्मचारी दिल्लीच्या उत्तर-पश्चिम भागात राहतो आणि त्याचे ऑफिस गुरुग्राममध्ये होते.
हेही पाहा- चक्क बाईकला लावलं ट्रॅक्टरचं चाक, सोशल मीडियावर व्हायरल होतोय अनोखा जुगाड, व्हिडीओ पाहून डोकंच धराल
त्यांनी लिहिलं आहे, “चांगल्या पगाराची एका चांगल्या कंपनीत मला नोकरी मिळाली. कंपनीला लोकांची गरज होती त्यामुळे त्यांनी मुलाखतीनंतर लगेच मला कामावर घेतले. माझी पहिली नोकरी असल्याने मी उत्साही झालो पण मला जाणवले की दररोज ऑफिसला पोहोचायला लागणारा वेळ खूप जास्त होता. मी दिल्लीच्या उत्तर-पश्चिम भागात (पिंक लाईन) राहतो आणि ऑफिस “मौलसरी अव्हेन्यू” येथे होते. खूप विचार केल्यानंतर लक्षात आले की, मी फक्त ३ तास घरी असेन, कारण उरलेला वेळ ऑफिसच्या कामात आणि ये-जा करण्यात जाणार आहे. शिवाय या प्रवासासाठी महिनाभरात सुमारे ५ हजार खर्च येणार आहे शिवाय मी माझे घरही बदलू शकत नाही.”
यावेळी या तरुणाने Reddit वापरकर्त्यांकडून नेमकं काय करावे याबद्दल सल्ला देखील घेतला. कारण अनेक चांगल्या आणि मोठ्या कंपन्या गुरुग्राममध्ये आहेत. या व्यक्तीच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी त्यांच्या स्वत:च्या प्रवासाचे अनुभव सांगितले आहेत. तर काही लोकांनी त्याला ऑाफिसजवळ घर घेण्याचा सल्ला दिला आहे.
आपला अनुभव शेअर करताना एका यूजरने लिहिलं, “मी गाझियाबादहून गुडगावला जातो. मला ऑफिसला जायला १२० ते १३० मिनिटे लागतात. माझ्या एका वरिष्टांनी मला मेट्रोमधून प्रवास करताना पुस्तके घेऊन जाण्याचा सल्ला दिला, आता जवळपास ६ वर्षांपासून हे करत आहे. ”वेळेचा सर्वोत्तम वापर.” दुसर्याने लिहिले, “तुम्हाला सुरुवातीच्या वर्षांत कठोर परिश्रम करावे लागतील, काही त्याग करावे लागेल. एकदा का तुम्ही या क्षेत्रात प्राविण्य मिळवले की नंतर तुम्हाला खूप आराम वाटेल.”