देवा रे देवा! बटाटे विकणाऱ्याने २.४ लाख रुपये मोजून विकत घेतला बीएसएनएलचा नंबर

महागड्या फोनसोबत व्हीआयपी नंबरबाबतही लोकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते.

BSNL_VIP_NO
देवा रे देवा! बटाटे विकणाऱ्याने २.४ लाख रुपये मोजून विकत घेतला बीएसएनएलचा नंबर

महागड्या फोनसोबत व्हीआयपी नंबरबाबतही लोकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. खरं तर व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबरचा कोणताच अतिरिक्त फायदा होत नाही. मात्र हे फोन नंबर लक्षात ठेवणं सोपं असतं. भारतात बीएसएनएल इतर कंपन्यांच्या तुलनेत तितका आकर्षक ऑपरेटर नाही. मात्र व्हीआयपी आणि फॅन्सी नंबरसाठी लोकप्रिय आहे. नुकताच राजस्थानच्या कोटामधील एका बटाटा व्यापाऱ्याने बीएसएनएलचा व्हीआयपी नंबर खरेदी केला. त्याने २.४ लाखांची बोली लावत हा नंबर विकत घेतला. तसं पाहिलं तर, फोन नंबरसाठी इतकी रक्कम मोजणं आवक्याबाहेरचं आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

बीएसएनएलचे व्हीआयपी नंबर वेबसाइटवर उपलब्ध आहेत. बटाटे व्यापाऱ्याने व्हीआयपी नंबरसाठी बोली लावली तो नंबर XXX7000000 असा आहे. या नंबरसाठी बोली २० हजारांपासून सुरु झाली होती. एका कालावधीनंतर ही बोली दोन लाखांच्या वर केली. सर्वात जास्त बोली कोटाच्या बटाटे व्यापाऱ्याने लावली आणि व्हीआयपी नंबर विकत घेतला, असं वृत्त हिंदी डेलीने दिलं आहे.

Bride Dance Video : स्वतःच्याच लग्नात नवरीने केला इतका जबरदस्त डान्स की लोक जोरजोराने ओरडू लागले…

महागडा मोबाईल नंबर खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं अनुज डूडेजा असं नाव आहे. अनुज हे व्यापारी असून बटाटे विकण्याचा व्यवसाय करतात. अनुज यांना व्हीआयपी नंबर वापरण्याची आवड आहे. लिलावात बोली सरस ठरल्यानंतर बटाटे व्यापाऱ्याने फरुखाबादच्या बीएसएनएल कार्यालयात जाऊन नंबर घेतला. डूडेजा यांचा हा पहिला व्हीआयपी नंबर नाही. यापूर्वीही डूडेजा यांनी व्हीआयपी नंबर विकत घेण्यासाठी १ लाख रुपये मोजले होते. बीएसएनएलच्या वेबसाईटवर अनेक व्हीआयपी नंबर आहेत. त्यासाठी वेबसाईटवर जाऊन बोली लावू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The potato seller bought the bsnl number more 2 lakh rupees rmt

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या