सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. प्राण्यांच्या विचित्र हरकती नेटकऱ्यांना व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला आवडतात. जंगली आणि पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओ वेगाने व्हायरल होतात. कुत्रे-मांजरीचे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात. मांजर उंदराला सळो की पळो करून शिकार करते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील ज्यात मांजर उंदरांच्या मागे धावताना दिसते. नुकताच सोशल मीडियावर एका पाळीव मांजरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक पाळीव मांजर शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला लहानपणी पाहिलेले ‘टॉम अँड जेरी’ हे कार्टून आठवेल. ‘टॉम अँड जेरी’ या कार्टून शोमध्ये टॉम नावाची मांजर कायम जेरी नावाच्या उंदराच्या मागे धावत असते.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मांजर उंदराची शिकार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मांजरीपासून जीव वाचवताना उंदीर लाकडी काठीचा आधार घेत वर चढल्याचे दिसत आहे. शेवटी त्या उंदराची वाट पाहत मांजर खाली बसलेली दिसत आहे. तर उंदीर भीतीने वर बसल्याचं दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला १ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया देत आहे.