देशाची राजधानी दिल्लीत आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी एक भावनिक व्हिडीओ समोर आला. नॅशनल वॉर मेमोरियलला (National War Memorial ) भेट देण्यासाठी एक महिला आली होती, पण जेव्हा तिने मेमोरिअलमध्ये आपल्या भावाचे नाव पाहिले तेव्हा तिला स्वतःला सावरता आले नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महिलेचा हा व्हिडीओ तिच्या पतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

नाकी काय झालं?

खरं तर शगुन नावाची एक महिला दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी आली होती. पण देशासाठी प्राण देणार्‍या शहीद जवानांच्या यादीत तिचा भाऊ कॅप्टन संब्याल याचे नाव पाहिल्यावर तिला रडू आवरले नाही. राष्ट्रीय युद्ध स्मारक स्वतंत्र भारताच्या सशस्त्र संघर्षात लढलेल्या भारतीय सैन्याच्या सैनिकांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी बांधले गेले. या स्मारकात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सुपुत्रांची नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत.

(हे ही वाचा: पावनखिंड चित्रपटाच्या वेळी सांगलीच्या चित्रपटगृहात तरुणांनी दिली शिवगर्जना; अंगावर काटा आणणारा Video Viral)

(हे ही वाचा: तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral)

शगुन संब्याल यांच्या पतीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, आज आम्ही अचानक दिल्लीला जाण्याचा प्लॅन केला. प्रथम आम्ही कॅनॉट प्लेसला गेलो आणि त्यानंतर मी माझ्या पत्नीला सांगितले नॅशनल वॉर मेमोरियलला जाऊ या.

(हे ही वाचा: “गडपती, गजअश्वपती, भूपती…” पावनखिंड चित्रपटाच्या वेळी चित्रपटगृहात शिवगर्जना देणाऱ्या तरुणाचा Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या व्यक्तीने लिहिले की, तो तिथे अंकती विक्रम बत्रा आणि मेजर अजय सिंग जसरोटिया यांच्या नावाचे फोटो काढत असताना त्याच्या पत्नीसमोर तिच्या भावाचे नाव आले. शगुनला अचानक त्याच्या भावाचे नाव स्मारकात सापडले आणि मला हाक मारली, हे बघ भावाचे नाव. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीची एक भावनिक व्हिडीओ शूट करत ती क्लिप इंस्टाग्रामवरही शेअर केली आहे.