आजकाल शब्दांपेक्षाही इमोजींचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. इमोजी आल्यानंतर संवादाची भाषाच जणू बदलली. शब्दांची जागा हळूहळू इमोजी घेऊ लागले. इमोजीमुळे आपले संवाद साधणं खूपच सोप्प झालंय. जे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही ते इमोजीच्या माध्यमातून व्यक्त करता येतं. नुकताच ‘वर्ल्ड इमोजी डे’ पार पडला आणि यानुसार फेसबुकने जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इमोजींची यादी जाहीर केलीय. फेसबुकवर चॅटिंग, पोस्ट किंवा कमेंट करताना या १० इमोजींचा वापर सर्वाधिक केला जातो.

(फेसबुक)
(फेसबुक)

त्याचबरोबर ग्राफीकच्या माध्यमातून देखील कोणत्या देशात कोणत्या इमोजीचा वापर सर्वाधिक केला जातो  हे  देण्यात आलंय. त्यानुसार मेक्सिको, अमेरिका, ब्राझील, थायलंड, स्पेन, इटली, ब्रिटन, जर्मनी यांसारख्या देशांत कोणत्या इमोजीचा सर्वाधिक वापर केलाय हे सांगितले आहे.

(फेसबुक)
(फेसबुक)

‘वर्ल्ड इमोजी डे’च्या निमित्ताने अॅपनेने देखील आपल्या युजर्ससाठी काही खास इमोजी आणले आहेत.  यात स्तनपान  करणारी महिला, योगा ट्रेनर, सँडविच, नारळ, झॉम्बी यासारख्या इमोजीचा समावेश आहे. टीम कुक  यांनी ट्विट करत स्वत: या इमोजींची माहिती दिली आहे.

(AFP)
(AFP)