Robery With Batting Style : तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील पण कधी बॅटिंग करत चोरी करत असल्याचे ऐकले आहे का? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. सध्या अशाच एका बाईकचोराचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. बॅटिंग करत चोरी करण्याची पद्धतीमुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना घडत आहे. कधी भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिणे ओढून नेतात तर कधी लोकांच्या अंगावर खुजली पावडर टाकून मौल्यवान ऐवज चोरतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा भरदिवसा किंवा रात्रीच्या अंधारात बाईक चोरणाऱ्यांचे व्हिडिओ देखील चर्चेत येत असतात. सध्या बॅटिंग करत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याची सर्वत्र चर्चा होता आहे.

व्हिडीओमध्ये पाहून शकता की एक तरुण हातात बॅट घेऊन गल्लीतून जात आहे. इतर लोकांची गल्लीतून ये-जा सुरु आहे. दरम्यान गल्लीत लावलेल्या एका बाईकजवळ हा तरुण थांबतो आणि बॅटिंग करत असल्याची कृती करतो. दरम्यान बॅटिंग करत असल्याची नक्कल करताना तो मध्येच बाईकचा हँडल चेक करतो त्यानंतर बॅटिंग करताना अचानक तो बाईकवर जाऊन बसतो. तो बाईक घेऊन फरार होणार तेवढ्यात त्याचे लक्ष समोर लावलेल्या सीसीटिव्हीकडे जाते. त्यानंतर चोरटा चुपचाप गाडीवरून उतरतो आणि तोंडासमोर बॅट धरून पकडून चेहरा लपवतो आणि तेथून पळ काढतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट ही केल्या आहेत.

हेही वाचा – “काका, माफी मागा” वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चुकून मांसाहारी जेवण देणाऱ्याला प्रवाशाने मारली कानाखाली…पाहा Viral Video

View this post on Instagram

A post shared by MEMES_BY_ZAIB_10 (@memes_by_zaib_10)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
बाईकचोराचा बॅटिंग करत चोरीचा प्रयत्न

मुलांना क्रिकेट खेळायला प्रचंड आवडते. तुम्हाला रस्त्याने जाता-येता अचानक बॉलिंग किंवा बॅटिंग करत असल्याची कृती करताना अनेक मुले दिसत असतील. ही कृती त्यांच्या क्रिकेटप्रती प्रेमातून सहसा निर्माण होते. पण चोरट्याने मात्र आपली शक्कल लढवून बॅटिंग करत असल्याचा बनाव करत चक्क बाईक चोरण्याचा प्रयत्न केला. हे पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा – विनातिकिट एसी कोचमध्ये प्रवास करता होता पोलिस कर्मचारी, टीसीने चांगलेच सुनावले, पाहा Viral Video

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी चोरट्याची खिल्ली उडवली. एकाने लिहिले, “त्याचा डाव फसला” दुसरा म्हणाला, “भावाला क्रिकेटर व्हायचे होते आणि पण आयुष्यातील परिस्थितीने त्याला चोर होण्यास भाग पाडले”