भक्ती म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर तुम्हाला आसक्ती, प्रेम, विश्वास, श्रद्धा, उपासना, धार्मिकता किंवा प्रेम असे अनेक अर्थ मिळतील. पण भक्ती या शब्दाचा अर्थ कोणत्याही शब्दामध्ये समावेल इतका छोट नाही. भक्तीचा अर्थ समजून घेण्यासाठी ती अनुभवता आली पाहिजे. भक्ती म्हणजे काय याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एखाद्या व्यक्तीचा नसून चक्का एका मांजरीचा आहे. आतापर्यंत तुम्ही मनुष्य देवावर कशी भक्ती करतो याच्या कथा ऐकल्या असतील पण सध्या व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क एका मांजराची देवावरील भक्ती दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मांजर एका मंदिरातील मुर्तीला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून लोकानां त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये.

इंस्टाग्रामवर navvandirababu नावाच्या पेजवर हा व्हिडीओ १५ मार्च रोजी शेअर केलेला आहे. व्हिडीओ शनी देवाच्या मंदिरातील आहे पण हे मंदिर कोठे आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. व्हिडीओ शुट करणाऱ्या व्यक्ती हिंदी भाषेत संवाद साधत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक मांजर शनीदेवाच्या मुर्तीची प्रदक्षिणा घालत आहे. काही क्षण थांबूनन ती मदिंरात येणाऱ्या भाविकांकडे पाहत आहे आणि पुन्हा प्रदक्षिणा घालत आहे. दरम्यान व्हिडीओ शुट करणाऱ्या व्यक्ती मंदिरात आलेल्या भाविकांना सांगत आहे की, “ही मांजर गेल्या तीन दिवसांपासून मुर्तीला प्रदक्षिणा घालत आहे. फक्त शनी देव नव्हे तर तिने महादेव, हनुमान सर्व मंदिरामध्ये जाऊन ही मांजर प्रदक्षिणा घालत आहे.”

हेही वाचा – “स्वप्न, परिस्थिती अन् सरकारी नोकरी”; टॅफिक सिग्नलवर थांबून अभ्यास करतोय झोमॅटो डिलिव्हरी बॉय, Viral Video बघाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांजरीला प्रदक्षिणा घालताना पाहून मंदिरातील भाविक थक्क झाले आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ पाहून लोकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. एका मांजराची देवावर इतकी श्रद्धा पाहून आश्चर्य व्यक्त तेले आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी हर हर महादेव, ओम नमः शिवाय असे जयघोष करणारी कमेंट केली आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले, शिवाय(महादेवाने) प्रत्येक जीवाला मांजरीप्रमाणे भक्ती करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.” दुसऱ्याने लिहिले, “खरचं देव आहे” तिसऱ्याने लिहिले, लोक इंस्टाग्रामवर भटकंती करत आहेत आणि इथे तू (मांजर) देवाभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चौथ्याने लिहिले , “मागच्या जन्मीचा भक्त”