सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये जुगाडचे व्हिडीओ खूप असतात. अनेकदा लोक स्वत:च्या सोयीसाठी काही ना काही जुगाड करताना दिसतात पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण दुसऱ्याला मदत करण्यासाठी जुगाड करताना दिसत आहे. एक दिव्यांग व्यक्तीची मदत करण्यासाठी एका तरुणाने जुगाड करून लाकडी सायकल तयार केल्याचे दिसते आहे. तरुणाची माणुसकीचे लोक कौतूक करत आहे. आपल्या कौशल्याचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण आहे व्हिडीओ.
जुगाड करून बनवली लाकडी सायकल
इंस्टाग्रामवर akshay_r_15 नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तरूण सांगतो की, एका दिव्यांग व्यक्तीला रस्त्यावर तो नेहमी पाहतो. तो हाताच्या मदतीने जमिनीवर बसून पुढे सरकताना दिसतो आहे. तरुणाला त्या व्यक्तीची दया येते आणि त्याची मदत करण्यासाठी लाकडी सायकल तयार करताना दिसतो आहे. एक लाकडी फळी बसेल असा लोखंडी सांगाडा तयार करून त्याला चाक बसवताना दिसत आहे. ही लाकडी सायकल तो त्या दिव्यांग व्यक्तीला जाऊन देतो. त्या व्यक्तीला त्या फळीवर बसवतो. तो व्यक्ती या तरुणाचे आभार व्यक्त करून त्याला आशिर्वाद देतो आहेत.
लोकांनी माणुसकीचे केले कौतूक
तरुणाच्या मनाचा मोठेपणा पाहून लोक भारावून गेले आहे. तरुणाच्या प्रयत्नाचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले, दादा हा व्हिडीओ पाहून तुला लाइक्स भरपूर मिळतील पण जो आशिर्वाद काका देत आहे तो लाख मोलाचा आहे. असेच काम करत रहा, “फुल ना फुलाची पाकळी” दुसरा म्हणाला, “खुप भारी रे दादा व्हिडिओ आवडला म्हणून स्टेट्सला पण ठेवला” तिसरा म्हणाला, “छान कार्य अशीच मदत करत रहा, तुम्हाला काही कमी नाही पडणार” चौथा म्हणाला, “देव तुला नक्कीच याच परत चांगलं फळ देणार आहे मित्रा!!”