तुम्ही सोशल मीडियावर साप प्राण्यांना गिळतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. साप किंवा नाग बेडूक आणि उंदीर यांची सहज शिकार करतो. सापांच्या शिकारीचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. मात्र, आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत. खरं तर, उंदराने नागापासून सुटका करण्यासाठी भन्नाट युक्ती वापरली आहे जी पाहिल्यानंतर तुम्ही उंदराच्या बुद्धिमत्तेचे कौतुक कराल आणि आश्चर्यचकित व्हाल.
जेव्हा मृत्यूसमोर उभा राहतो तेव्हा प्रत्येकाला आयुष्याची खरी किंमत कळते. मृत्यूच्या तावडीतून सुटका करण्यासाठी जीवाची धडपड सुरू असते. अशाच प्रकारे जेव्हा एका उंदरासमोर जेव्हा त्याचा मृत्यू सापाच्या रुपात उभा राहतो तेव्हा उंदीर जीव वाचवण्यासाठी तो मृत्यूबरोबर लपंडाव खेळत आहे हे दर्शवाणारा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
सहसा साप किंवा नाग उंदीर पकडून शिकार करतो. पण कधी कधी निसर्गाचे असा चमत्कार पाहायला मिळतो जो पाहून सर्वजण थक्क होतात. जर उंदीर साप किंवा नाग समोर येतो तेव्हा ते उंदराला लगेच खाऊन टाकतात. पण यावेळी कथा पूर्णपणे वेगळी आहे. आपला जीव वाचवण्यासाठी उंदीर थेट नागाच्या फण्यावर चढतो जेणेकरून तो त्याला दिसू नये. हे दृश्य पाहून लोक थक्क होतात.
उंदीर त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या नागाच्या डोक्यावर बसला आहे. नाग त्याचा फणा काढून उभा आहे आणि उंदीर त्याच्या डोक्यावर बसला आहे. त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी, उंदीर कधी डोक्यावरून खाली जात आहे तर कधी वर येत आहे. नागालाला उंदीर दिसत नसल्याने तो त्याला शोधत आहे. नागाबरोबर हटके पद्धतीने लंपडाव खेळ उंदीर आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ पाहताना काळजाचा थरकाप उडत आहे. पण उंदराची हुशारी पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. लोक उंदराच्या मेंदूचे कौतुक करत आहेत. बरेच लोक म्हणतात की शेवटपर्यंत आशा सोडू नये. व्हिडिओ पाहिल्यानंतर हीच शिकवण मिळते की,” संकटकाळात कधीही कोणी आशा सोडू नये कारण नशीब केव्हा पलटी मारेल हे सांगता येत नाही.”