‘परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का….’ असं म्हणणाऱ्या अनेक तरुणींना त्यांच्या आयुष्यात अशाच एखाद्या राजकुमाराची प्रतिक्षा लागून राहिलेली असते. मुळात सर्वांच्याच आयुष्यात प्रेमाच्या, हक्काच्या व्यक्तीचा प्रवेश होतो हे खरं असलं तरीही राजकुमाराचं मन जिंकणाऱ्या मुली तशा कमीच दिसतात. पण, या परिस्थितीला काही अपवादही ठरतात. अभिनेत्री मेगन मार्कलच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारण २२ वर्षांपूर्वी ब्रिटनच्या राजघराण्याच्या बकिंगहम पॅलेससमोर फोटो काढणारी मेगन मार्कल आज त्याच राजघराण्याची सून झाली आहे. प्रिन्स हॅरीसोबत मेगनने नुकतीच सहजीवनाची शपथ घेतली. सोशल मीडियावर हॅरी आणि मेगनच्या लग्नाचे सुरेख असे फोटो चर्चेत असतेवेळी आणखी एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं. ज्या फोटोमध्ये मेगन बकिंगहम पॅलेससमोरील भागामध्ये एका फोटोसाठी पोझ देत असल्याचं पाहायला मिळालं.

वाचा : प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?

आता नशिबाची खेळी म्हणा किंवा आणखी काही. पण, हा योग असा काही जुळून आला की ज्या महालासमोर मेगनने मोठ्या कुतूहलाने फोटो काढला होता त्याच राजमहालात २२ वर्षांनंतर ती सून म्हणून प्रवेश करत होती. हा सुरेख योग सध्या चर्चेचा विषय ठरला असून, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोठ्या कलात्मकपणे हा फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे मेगनचा प्रवास अनेकांनाच थक्क करुन जात आहे. ‘कुछ दूर चलते ही…’ या ट्रेंडची जोडही या फोटोला मिळाली आहे. त्यामुळे मेगन आणि हॅरी यांची सुरेख अशी परीकथेतील प्रेमकहाणी म्हणजे एक स्वप्नच आहे, असं म्हणायला हरकत नाही. एक असं स्वप्न ज्याचं साक्षीदार होण्याची संधी साऱ्या जगाला मिळाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Throwback photo of american actress meghan markle outside buckingham palace proves that dreams do come true see photo prince harry royal wedding
First published on: 21-05-2018 at 15:30 IST