सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यामुळे आसपासच्या घडणाऱ्या घटनांचा आपल्याला अंदाज येत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या पायाखालची वाळू सरकते. तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला राग अनावर होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही मुलं कुत्र्याला नाहक त्रास देताना दिसत आहेत. कुत्र्यावर रंग फेकत आहेत. मात्र साखळी बांधलेली असल्याने कुत्रा न पळू शकत, ना प्रतिकार करता येत आहे, असं दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही खोडकर तरुण त्यांच्या मस्तीसाठी कुत्र्याला कसे त्रास देत आहेत. कुत्रा भुंकण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नसल्याचं दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ tedthestoner नावाच्या युजरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत माहितीही शेअर केली आहे. “हे २०२२ आहे, लोक अजूनही प्राण्यांसोबत अशी थट्टा करत आहेत. हे दुःखद आहे. प्राण्यांना किती त्रास होतो, हे त्यांना माहीत नाही. हा व्हिडीओ डेहराडून, उत्तराखंड येथील आहे. आपण आपला रंग धुवू शकतो, परंतु प्राणी तसं करू शकत नाहीत. या रंगाचा त्याला महिनोनमहिने त्रास होईल. जनावरांच्या आरोग्यासाठीही ते चांगले नाही.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, “नि:शब्द बोलू शकत नाहीत, पण त्याला होणाऱ्या वेदना जाणवू शकतात.” दुसर्या यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, “असे व्हिडीओ पाहून खूप वाईट वाटते.”