Viral video: सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात.तरीही काहींना या प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा मोफ आवरत नाही. अशाच एका व्यक्तीला वाघाच्या जवळ जाणं चांगलंच महागात पडलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हालाही पाहून घाम फुटेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती वाघाजवळ जायची चूक करतो आणि वाघाच्या तावडीत चांगलाच फसतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाघ व्यक्तीसा पाहताच थेट त्याच्या अंगावर धावून जातो. आणि पुढे त्याच्या मानेचा चावा घेताना दिसत आहे. आधी तो त्या व्यक्तीच्या पायावर हल्ला करतो आणि नंतर वर पाहताच त्याची मान पकडतो. व्यक्तीही पुरता घाबरला असून त्याचं नशीब बलवत्तर म्हणून वाघ चिडलेला नसून मस्तीच्या मूडमध्ये आहे. नाहीतर वाघानं त्याला एका पंजातच शिकार बनवलं असतं.

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Furious gaur tosses man in the air after he provokes
“आ बैल मुझे मार!” चिडलेल्या रानगव्याने व्यक्तीला तीन वेळा उचलून आपटले, थरारक Video Viral

वाघ मस्ती करत असला तरी त्याचं वजन या व्यक्तीला काही पेलत नाहीये. त्यामुळे तो खूप घाबरलेला दिसत आहे. तसेच आजबाजूलाही अनेक लोक जमल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बसमध्ये तरुणाच्या तोंडावर थुंकली महिला; मग तरुणानंही दाखवला इंगा, VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. वाघ हा जंगलाचा राजा आहे. हा सुंदर प्राणी भारतातील विविध जंगलांमध्ये, अभयारण्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे वाघांच्या संवर्धनाबाबत आपल्या देशातील लोक अधिक जागरुक असतात. जंगलांचे प्रमाण दिवसेनदिवस कमी होत असल्याने वनप्राण्यांची संख्या कमी होत आहे. हरीण, सांबर असे प्राणी वाघाची शिकार असतात. हे प्राणी नाहीसे झाल्याने भक्ष्य मिळवण्यासाठी वाघांसारखे जंगली प्राणी नाईलाजाने मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात.