वाघ बिबट्या आणि चिता खतरनाक शिकारीसाठी ओळखला जातो. या तीन प्राण्यांची जंगलात इतकी दहशत आहे, मोठे-मोठे प्राणी त्यांच्यापासून लांब राहणं पसंत करतात. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.वाघ म्हटलं की सगळ्यांचा थरकाप उडतो. याच्यापासून माणसं काय प्राणीही लांब पळतात मात्र एका बदकाने वाघाची फिरकी घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाण्यात बदक आणि वाघ आहे. वाघ बदकाची शिकार करण्यासाठी म्हणून पाण्यात उतरला. पण बदक त्याच्या समोर असूनही त्याला पकडता येत नव्हतं. कारण चलाक बदक वाघाच्या तावडीतच सापडत नव्हता. जसा वाघ हल्ला करण्यासाठी यायचा तसे हे बदक पाण्यात डुबकी मारुन लपून बसायचं. थोड्यावेळाने पुन्हा हे बदक बाहेर यायचं वाघाच्या भोवती फिरायचं आणि वाघाने पाहिलं की पुन्ही पाण्यात जायचं.

सहसा वाघाच्या तावडीतून शिकार सुटत नाही मात्र या बदकाने कमालच केली आहे, वाघाने अनेकदा प्रयत्न करुनही हे बदक काही वाघाला सापडलं नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: एस्कलेटवर भीषण अपघात; लोकांवर अचानक कोसळलं छत, १० ते १२ जण चिरडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@Rainmaker1973 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बदकाच्या हुशारीचं नेटकरीही कौतूक करत आहेत.